प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी

प्रवासाचा वेळ कामाच्या तासात मोजला जावा, कर्मचाऱ्यांची मागणी

Working Hours - इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के चाकरमान्यांनी प्रवासाचा वेळ हा कामाच्या तासांमध्ये मोजला जावा असं मत व्यक्त केलंय.

  • Share this:

प्रणाली कापसे

मुंबई, 21 जून : अनेक शहरांमध्ये नोकरदारांचा बराच वेळ कामावर पोचण्यातच जातो. त्यामुळे आॅफिसमधले तास आणि प्रवासाचे तास असं धरलं तर जास्त वेळ प्रवासातच जातो. मग प्रवासाचा वेळ कामाच्या तासात पकडला गेला तर काय बहार येईल नाही का ? इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणात 61 टक्के चाकरमान्यांनी  प्रवासाचा वेळ हा कामाच्या तासांमध्ये मोजला जावा असं मत व्यक्त केलंय.

मुंबई हे चाकरमान्यांचं शहर. इथल्या चाकरमान्यांचं आयुष्य चालतं ते लोकल ट्रेनचं टाईम टाबेल आणि घड्याळाच्या काट्यावर. कारण लोकल चुकली की  दिवसाचं आणि महिन्याच्या पगाराचंही गणित चुकतं. कितीही आटापिटा केला तरी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचता येईलच याची शाश्वती देता येत नाही.

साउथ इंडिया बँकेत सुरू आहे बंपर भरती, 'या' पदांसाठी असा करा अर्ज

घरी बसून एका काॅलवर ट्रेन तिकीट होईल रद्द, जाणून घ्या प्रोसेस

इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपनं केलेल्या सर्वेक्षणात 80 देशांमधील 15 हजार कर्मचाऱ्यांनी मतं नोंदवली. ऑफिसला जाणाऱ्या 61 टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ हा कार्यालयीन वेळाचा भाग म्हणून ग्राह्य धरला जावा असं मत व्यक्त केलं. देशातल्या 80 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कामाच्या वेळांसंदर्भात असणारे निर्बंध शिथिल केले असल्याचं म्हटलंय.

'असा' करा योगाचा व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये

ऑफिसला जाण्यासाठी प्रवासात दिवसेंदिवस जास्तीत जास्त वेळ घालवावा लागत असल्यानं कर्मचारी नाराज आहेत. 58 टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये कामाच्या वेळेसंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले असून फ्लेक्झिबल वर्कप्लेस धोरण स्वीकारलं असल्याचं मान्य केलंय. कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन ठेवल्यास कंपनीला फायदा होतो असं 85 टक्के उद्योजकांनी सांगितलं. कामाची वेळ लवचिक असावी असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबईच नाही तर हल्ली पुणे, दिल्ली, बंगळुरू अशा सगळ्याच शहरात प्रवासाचे तास वाढलेत. त्यामुळे प्रवासाचे तास कामाच्या तासात मोजले गेले तर सर्व कर्मचारी खूशच होतील.

VIDEO: टिक टॉक व्हिडिओसाठीचा स्टंट पडला महागात

First published: June 21, 2019, 5:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या