कोरोना काळात अनेकजण नोकरी गेल्यानं बेरोजगार झाले, तर काहींनी कोरोनाकाळ ही संधी समजत व्यवसायात भरारी घेतली. आज अनेकजण असे दिसतात, ज्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीपुढे हताश न होता व्यवसाय सुरू केला, आणि आता त्यांच्या व्यवसायाची उलाढाल लाखोंच्या घरात आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिने कोरोना काळात स्वतःच्या व्यवसायात जम बसवला, व आता ती महिन्याला तब्बल 20 लाख रुपये कमवत आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
जगामध्ये असे अनेक लोक आहेत, जे स्वतःचं करिअर घडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात, तर काही लोक स्वतःचं नशीब स्वतः बदलतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल माहिती देणार आहोत, जिने कोविडच्या संकटाला संधीत बदलून तूप विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या महिलेचं नाव कमलजित कौर असून त्या 51 वर्षाच्या आहेत. त्या लोणी किंवा सायीऐवजी दह्यापासून तूप तयार करतात, व महिन्याला लाखो रुपये कमवतात. कमलजित बनवत असलेल्या तुपाची मागणी इतकी वाढलीय की, परदेशातील लोकही हे तूप विकत घेण्यासाठी ऑर्डर देत आहेत. व्यवसायात झपाट्यानं वाढ झाल्यामुळे आता त्या दरमहा सुमारे 20 लाख रुपये कमवतात. तसंच या कमाईतील 1 टक्के रक्कम गुरुद्वारामध्ये पूजा करण्यासाठी आणि गरिबांच्या अन्नदानासाठी दान करतात.
भरमसाठ परतावा हवाय? 'या' स्किम्स आहेत बेस्ट, टॅक्स बेनिफिटचाही मिळेल लाभ
कमलजित यांनी 2020 मध्ये मुंबईत ‘किमूज किचन’ नावानं व्यवसाय सुरू केला. त्यांचा व्यवसाय ताज्या तुपाशी संबंधित होता. हे तूप बनवण्यामागचा त्यांचा उद्देश असा होता की, त्या लोकांना घरी बनवलेलं फ्रेश तूप खाऊ घालू शकतील. विशेष म्हणजे तूप तयार करण्यासाठी त्यांनी क्लासिक बिलोना तंत्राचा वापर केला. यासाठी त्या पंजाबच्या लुधियाना शहरातून मुंबईमध्ये दूध मागवतात. कारण त्यापासून बनणारं तूप खूपच दर्जेदार आहे. कमलजित यांना लुधियानाहून तूप बनवण्यासाठी दूध आणणं इतकं सोपं नव्हतं. तसेच दुधाच्या चवीत आणि गुणवत्तेत कोणताही बदल होऊ नये, याची काळजीही त्यांना घ्यावी लागत होती. हे आव्हान मात्र त्यांनी सहज पेललं.
तूप बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत, हे तुम्हालाही माहिती असेल. पण कमलजित यांची तूप बनवण्याची स्वतःची एका खास पद्धत आहे. या पद्धतीला बिलोना म्हणतात. यामध्ये लोणी, साय किंवा दुधाऐवजी दह्यापासून तूप बनवलं जातं. या पद्धतीनुसार, प्रथम गाईचं दूध उकळवून थंड केलं जातं, नंतर त्यात एक चमचा दही मिसळलं जातं. यानंतर ते रात्रभर एका खोलीत ठेवलं जाते, आणि दुसऱ्या दिवशी त्यातून तूप काढलं जातं.
दरम्यान, नोकरीची श्वाश्वती नसल्यामुळे सध्या व्यवसाय करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. पण चांगली कमाई होण्यासाठी योग्य व्यवसायाची निवड करणं महत्त्वाचं आहे.
पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममध्ये केवळ 100 रुपयांचीही करता येईल गुंतवणूक, मिळेल चांगला परतावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Business News