मुंबई, 22 जानेवारी: पैशांनीच पैसा वाढतो असं तुम्ही अनेकदा वाचलं असेल. ही गोष्ट खरंच सत्य आहे. कारण पाई-पाय जोडूनच मोठा फंडा निर्माण होऊ शकतो. यामुळे भविष्यातील मोठी गरज पूर्ण करण्यासाठी आजपासूनच पैसे जोडणे सुरू करावे लागेल. भविष्यात कोणताही मोठा खर्च करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे पैसे बाजूला टाकावे लागतील असं नाही. तुम्ही केवळ 100 रुपयेही बचत करु शकता. पोस्ट ऑफिसची एक खास योजना तुम्हाला ही संधी देतेय. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटमध्ये खूप कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. त्यात तुम्ही गुंतवलेल्या पैशाची सुरक्षितताही असते आणि परतावाही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ही लहान हप्त्यांमधील ठेव, चांगला व्याजदर आणि सरकारी हमी योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेविषयी डिटेल्स आपण समजून घेऊया.
किमान 100 रुपयांची करु शकता गुंतवणूक
तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये किमान 100 रुपये देखील गुंतवू शकता. यापेक्षा जास्त, तुम्ही 10 च्या मल्टीपलमध्ये कोणतीही रक्कम जमा करू शकता. यासोबतच जास्तीत जास्त जमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. दहाच्या पटीत कोणतीही मोठी रक्कम आरडी खात्यात जमा केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी रेकरिंग डिपॉझिट अकाउंट उघडले जाते. या योजनेत जमा केलेल्या पैशांवरील व्याजाची गणना दर तिमाहीत (वार्षिक दराने) केली जाते आणि ते प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडून दिले जाते. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज मिळत आहे.
जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या ‘या’ गोष्टी
अकाउंट कसं उघडायचं
तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आरडी खाते उघडू शकता. इच्छा असल्यास तुम्ही आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासह जॉइंट अकाउंट देखील उघडू शकता. तुम्ही हे खाते रु.100 ने सुरू करू शकता.
Post Office च्या ‘या’ स्किमने व्हाल मालामाल! निश्चित कालावधीच पैसे होतील डबलआरडी खाते उघडण्याचे नियम
कोणतीही व्यक्ती त्याला हवी तेवढी आरडी खाती उघडू शकते. खात्यांच्या मॅक्सिमम संख्येविषयी कोणतीही लिमिट नाही. खाते केवळ व्यक्तीच्या नावाने उघडले जाऊ शकते आणि कुटुंब (HUF) किंवा संस्थेच्या नावाने नाही. संयुक्त आरडी खाते दोन प्रौढ व्यक्ती एकत्रही उघडू शकतात. आधीच उघडलेले कोणतेही वैयक्तिक आरडी खाते कधीही संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. मात्र, आधीच उघडलेले संयुक्त आरडी खाते कधीही वैयक्तिक आरडी खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते.
तर आरडी खाते बंद केले जाऊ शकते
तुम्ही रिकरिंग डिपॉझिटचे हप्त्याचे पैसे देय तारखेपर्यंत जमा केले नाहीत, तर लेट हप्त्यासोबत, तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक टक्का दराने दंड देखील जमा करावा लागेल. तसेच सलग चार हप्ते जमा न केल्यास खाते बंद केले जाते. तसे, खाते बंद झाल्यानंतरही, ते पुढील दोन महिन्यांसाठी पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.यासाठी होम पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल आणि नवीन हप्त्यासोबत मागील सर्व हप्ते आणि दंडाची रक्कम जमा करावी लागेल.