जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Success Story: वडील केंद्रात मंत्री आणि मुलाने सुरू केली स्टार्टअप कंपनी, पाहा 'हा' कोणत्या नेत्याचा मुलगा

Success Story: वडील केंद्रात मंत्री आणि मुलाने सुरू केली स्टार्टअप कंपनी, पाहा 'हा' कोणत्या नेत्याचा मुलगा

महाआर्यम सिंधिया

महाआर्यम सिंधिया

महाआर्यमन सिंधियाने माय मंडी या नावाने भाजीपाल्याचं स्टार्टअप सुरू केलं आहे. ही ताजी फळं आणि भाज्यांचा पुरवठा करणारी ऑनलाइन कंपनी आहे.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 6 जून : ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांमध्येही त्यांचा सहभाग होता. सतत चर्चेत असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगाही आता चर्चेत आहे, तो त्याने सुरू केलेल्या स्टार्टअपमुळे. महाआर्यमन सिंधिया हा ज्योतिरादित्य यांचा मुलगा राजकारणात कधी येणार याबाबतही सगळ्यांना उत्सुकता आहे. जाणून घेऊ या महाआर्यमन सिंधिया यांच्याबद्दल आणखीही काही गोष्टी. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया राजघराण्याचा वारस असलेल्या महाआर्यमन सिंधिया याने वारशाने मिळालेल्या कार्यक्षेत्रात न रमता थेट उद्योगविश्वात पाऊल ठेवलं आहे. एका मित्राच्या साह्याने त्याने माय मंडी हे शेतीविषयक स्टार्टअप सुरू केलं आहे. येत्या दीड वर्षात या स्टार्टअपला चांगल्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सूर्यांश राणा या मित्रासोबत त्याने माय मंडी या कृषी स्टार्टअपची 2022मध्ये मुहूर्तमेढ रोवली. या स्टार्टअपद्वारे कृषी उत्पादनांचे अवशेष व वाहतूक खर्चात कपात करण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. Business Idea:‘हा’ बिझनेस करुन होता येईल मालमाल! औषधींपासून सौंदर्य प्रसाधानासाठी आहे उपयोगी महाआर्यमन सिंधियानेही वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणेच डून स्कूलमधून सुरुवातीचं शिक्षण घेतलं. त्यांनी गेल विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्याने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये काही काळ काम केलं. महाआर्यमनला संगीत आणि जेवणाची खूप आवड आहे. आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने कॅम्पबेल नावाचा संगीत महोत्सव सुरू केला आहे. त्याचप्रमाणे त्याने ‘प्रवास’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही सुरू केला आहे. ‘कॅम्पबेल’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती 75 हजार रुपये आणि ‘प्रवास’साठी 2 लाख रुपये प्रवेश शुल्क आकारलं जातं. महाआर्यमन सिंधियाने माय मंडी या नावाने भाजीपाल्याचं स्टार्टअप सुरू केलं आहे. ही ताजी फळं आणि भाज्यांचा पुरवठा करणारी ऑनलाइन कंपनी आहे. हे स्टार्टअप स्केल मॉडेलवर कार्य करतं. कंपनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करते. नंतर तो भाजी विक्रेत्यांकडे पाठवला जातो. सध्या कंपनीच्या सेवा जयपूर, नागपूर, ग्वाल्हेर आणि आग्रा इथं उपलब्ध आहेत. कंपनीचा महसूल सध्या महिन्याला एक कोटी रुपये असून तो या वर्षअखेरीस पाच कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई! ग्वाल्हेरमध्ये बांधलेल्या जय विलास राजवाड्यात महाआर्यमन राहतो. या पॅलेसमध्ये 400 खोल्या असून त्याचं मूल्य 4 हजार कोटी रुपये आहे. 1874मध्ये हा राजवाडा बांधण्यासाठी 1.1 कोटी रुपये खर्च झाले होते. महाआर्यमनचे वडील ज्योतिरादित्य सिंधिया सध्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 379 कोटी रुपये आहे

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात