मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलियोतील 'या' स्टॉकमधून 50 टक्के रिटर्नची शक्यता

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलियोतील 'या' स्टॉकमधून 50 टक्के रिटर्नची शक्यता

Jubilant Ingrevia फार्मा आणि अॅग्रो-केमिकल्स क्षेत्रातील (Agro Chemical Field) कंपनी आहे. ब्रोकरेज फर्म Edelweiss Securities ने जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे.

Jubilant Ingrevia फार्मा आणि अॅग्रो-केमिकल्स क्षेत्रातील (Agro Chemical Field) कंपनी आहे. ब्रोकरेज फर्म Edelweiss Securities ने जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे.

Jubilant Ingrevia फार्मा आणि अॅग्रो-केमिकल्स क्षेत्रातील (Agro Chemical Field) कंपनी आहे. ब्रोकरेज फर्म Edelweiss Securities ने जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 2 नोव्हेंबर : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक पुढील काही दिवसांत गुंतवणूकदारांना 50 टक्के रिटर्न देऊ शकतो. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील या स्टॉकचे नाव जुबिलंट इंग्रेव्हिया (Jubilant Ingrevia) आहे, जी फार्मा आणि अॅग्रो-केमिकल्स क्षेत्रातील (Agro Chemical Field) कंपनी आहे. ब्रोकरेज फर्म Edelweiss Securities ने जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअर्सवर खरेदीची शिफारस केली आहे. Edelweiss Securities ने गुंतवणूकदारांना 1006 रुपयांचे टार्गेट ठेवून जुबिलंट इंग्रेव्हिया खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात ज्युबिलंट इंग्रेव्हिया 672 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ असा की जे गुंतवणूकदार जुबिलंट इंग्रेव्हियाचे शेअर्स खरेदी करतील त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर 50 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतो. जुबिलंट इंग्रेव्हियाचा बॅलेन्सशीट चांगला एबीपी न्यूजच्या वृतानुसार Edelweiss Securities ने एका अहवालात म्हटले आहे की, कंपनीची फार्मा आणि कृषी क्षेत्रात मजबूत उपस्थिती आणि जागतिक नेत्यांशी चांगले संबंध यामुळे नवीन रसायनशास्त्र (डिकेटीन) आणि कृषी रसायने/सीडीएमओ उत्पादनात प्रवेश करण्यास मदत होईल. IndusInd Bank, Minda Corporation, SAIL या शेअर्सचं काय करायचं? एक्सपर्टचं मत काय? Edelweiss Securities च्या मते, जुबिलंट इंग्रेव्हियाचे बिझनेस मॉडेल सध्या गुंतवणूकदारांनी कमी मूल्यांकित केले आहे, तर कंपनी कर्जमुक्त असूनही 22 टक्क्यांहून अधिक भांडवलावर रिटर्न देत आहे. ज्युबिलंट इंग्रॅव्हिया ही विशेष रासायनिक उद्योगातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी जीवनसत्त्वे, रंग, औषधे आणि इतर सेंद्रिय संयुगे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पायरीडिन-आधारित उत्पादनांच्या अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. Sapphire Foods IPO चा प्राईज बँड 1120-1180 रुपये निश्चित, वाचा IPO बद्दल महत्त्वाच्या गोष्टी राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 5.5 टक्के हिस्सा राकेश झुनझुनवाला यांची जुबिलंट इंग्रेव्हियामध्ये 6.3 टक्के भागीदारी होती. पण जुलै-सप्टेंबर तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांनी जुबिलंट इंग्रेव्हियामधील त्यांचा हिस्सा 6.3 टक्क्यांवरून 5.5 टक्क्यांवर आणला. ज्युबिलंट लाईफ डिमर्ज झाली आणि त्यानंतर ज्युबिलंट इंग्रेव्हिया आणि जुबिलंट फार्मा या दोन कंपन्या बनल्या. ज्युबिलंट इंग्रेव्हिया यावर्षी मार्च 2021 मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाली होती. ज्युबिलंट इंग्रेव्हिया 271 रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाली होती. तेव्हापासून या समभागाने गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या