मराठी बातम्या /बातम्या /मनी /

IndusInd Bank, Minda Corporation, SAIL या शेअर्सचं काय करायचं? एक्सपर्टचं मत काय?

IndusInd Bank, Minda Corporation, SAIL या शेअर्सचं काय करायचं? एक्सपर्टचं मत काय?

काल Indusind Bank शेअर प्राईज निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढली. हा शेअर 7.80 टक्क्यांच्या वाढीसह 1,229.10 वर बंद झाला. तर Minda Coroporation Share Price 7.45 टक्क्यांच्या वाढीसह 167.30 च्या पातळीवर नवीन मल्टीइयर हाय केला होता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 2 नोव्हेंबर : शेअर बाजारात (Share Market) तीन दिवसांच्या घसरणीनंतर कालपासून तेजी दिसून येत आहे. BSE सेन्सेक्स 800 हून अधिक अंकांच्या वाढीसह 60,100 वर बंद झाला होता. तर निफ्टी 250 हून अधिक अंकांच्या वाढीसह 17,900 च्या वर बंद झाला. मोठ्या कंपन्यांसोबतच काल स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. काल निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1.82 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.86 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

काल इंडसइंड बँक (Indusind Bank Share Price) निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढली. हा शेअर 7.80 टक्क्यांच्या वाढीसह 1,229.10 वर बंद झाला. तर मिंडा कॉर्पोरेशनने (Minda Coroporation Share Price) 7.45 टक्क्यांच्या वाढीसह 167.30 च्या पातळीवर नवीन मल्टीइयर हाय केला होता. जून 2018 नंतरचा हा सर्वोच्च बंद होता. दुसरीकडे, कालच्या ट्रेडमध्ये सेलचा F & O Segment सर्वात मोठा Gainer ठरला आणि तो 8.82 टक्क्यांच्या वाढीसह 125.25 वर बंद झाला.

रिलायन्स सिक्युरिटीजच्या विकास जैन यांनी खाली स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

IndusInd Bank

या शेअरने 1125 च्या आसपास डबल बॉटम बनवला आहे आणि गेल्या काही दिवसांत जोरदार वाढ झाली आहे. स्टॉक त्याची 200- वीक अॅव्हरेज तोडण्याच्या अगदी जवळ दिसत आहे. त्यामुळे आता शेअरला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. येत्या आठवड्यातच शेअर 1400 ची रेंज गाठू शकतो. हा स्टॉक1180 च्या आसपास संधी मिळाल्यास खरेदी करता येईल.

Sapphire Foods IPO चा प्राईज बँड 1120-1180 रुपये निश्चित, वाचा IPO बद्दल महत्त्वाच्या गोष्टी

Minda Corporation

या शेअरमध्ये खूप वाढ झाली आहे. सध्या या शेअरचा रिस्क रिवॉर्ड रेश्यो (Risk Reward Ratio) अनुकूल दिसत नाही. म्हणून, नवीन खरेदी करण्याची शिफारस केली जाणार नाही. सध्याच्या पातळीवर नफा बुक करावा. एखाद्या घसरणीवर 140 रुपयांच्या आसपास शेअर मिळाला तरच खरेदी करावा.

याठिकाणी कारवर मिळेल 1 लाखांपर्यंतचे डिस्काउंट, 2 वर्षांसाठी सर्व्हिसिंग फ्री

SAIL

अलीकडे या शेअरमध्ये ब्रेकआउट दिसून आला आहे. पुढील काही महिन्यांत हा स्टॉक 52 वीक हायवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी 150 रुपयांच्या टार्गेटवर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market