नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: भारतीयांसाठी सोन्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला (Gold Investment) आर्थिकसह एक भावनात्मक महत्त्वही आहे. सोन्याचे दागिने सण-समारंभात एक विशेष महत्त्व प्राप्त करतात, शिवाय कठीण काळात सोन्याचा वापर निधी उभारण्यासाठी केला जातो. भारतीयांच्या घरात थोडफार सोनं तरी आढळून येत. काहींकडे वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या चालत आलेले दागिने देखील पाहायला मिळतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की जेव्हा तुमच्या आधीच्या किंवा त्याआधीच्या पिढीने सोनं खरेदी केलं असेल तेव्हा सोन्याचे भाव काय होते? किंवा भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1947 मध्ये सोन्याचे दर काय होते? आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सोन्याने किती रिटर्न दिला आहे?
1947 पासून सोन्याने दिला इतका रिटर्न
स्वातंत्र्यानंतर सोन्याने आतापर्यंत एकूण 58000 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 1947 मध्ये सोन्याचे दर 88 रुपये प्रति तोळा होते. 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याचे दर 100 रुपये प्रति तोळाच्या पार गेले होते. 1974 मध्ये सोन्याचे दर 500 रुपयांच्या स्तरा पलीकडे पोहोचले होते, तर 2007 मध्ये सोन्याचे दर 10000 रुपयांच्या जवळपास पोहोचले होते.
हे वाचा-स्वातंत्र्यदिनी SBI ची गृहकर्जावर खास ऑफर, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?
तर 2011 मध्ये सोन्यात उसळी पाहायला मिळाली, यावेळी सोन्याचे दर 26,000 रुपये प्रति तोळावर पोहोचले तर 2020 मध्ये सोन्याचे रेकॉर्ड स्तर गाठला. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळावर होते. आता सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरापेक्षा साधारण 10000 रुपयांनी कमी आहे.
1947 पासून चांदीने दिला इतका रिटर्न
सोन्यापाठोपाठ चांदीने किती रिटर्न दिला हे तपासायचे झाले तर, 1947 मध्ये चांदीचे दर 107 रुपये प्रति किलो होते. स्वातंत्र्यांनतर चांदीमध्ये 58,700% चा रिटर्न मिळाला आहे. 1974 मध्ये चांदीचे दर 1000 रुपयांपार पोहोचले होते, तर 1987 मध्ये पहिल्यांदा चांदी 5000 पेक्षा जास्त होती. तर 2004 मध्ये पहिल्यांदा चांदीचे दर 10000 पेक्षा जास्त होते.
हे वाचा-PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील महिन्यापासून होणार हा बदल
2008 मध्ये चांदीचे दर 25,000 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त होते. तर 2020 मध्ये चांदीने देखील रेकॉर्ड स्तर गाठला होता. गेल्यावर्षी चांदीचे दर 77,949 या सर्वोच्च स्तकावर पोहोचले होते. आता सर्वोच्च स्तरापेक्षा चांदी 15000 रुपये प्रति किलोने कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today