मराठी बातम्या /बातम्या /मनी /

75th Independence Day: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने SBI ची गृहकर्जावर खास ऑफर, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?

75th Independence Day: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने SBI ची गृहकर्जावर खास ऑफर, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय?

75th Independence Day 2021: तुम्ही स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर एसबीआय स्वस्त होम लोन (SBI Home Loan) ची ऑफर देत आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने (75th Independence Day) विविध बँकांकडून खास ऑफर दिल्या जातात. दरम्यान देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावर ऑफर (SBI Offer on Home Loan) देऊ केली आहे. एसबीआय ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग फी (Zero Processing Fee on Home Loan) देत आहे. एसबीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने एका ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, या स्वातंत्र्यदिनी गृहकर्जावर झिरो प्रोसेसिंग फी मिळवत तुमच्या स्वप्नातील घरात पाऊल टाका, आजच अप्लाय करा. महिलांसाठी खास ऑफर या ऑफर व्यतिरिक्त महिलांना होम लोनवर खास ऑफर दिली जात आहे. बँकेच्या गृहकर्जाच्या फॅसिलिटीअंतर्गत महिलांना 5 टक्के BPS इंटरेस्ट कन्सेशन देण्यात येत आहे. हे वाचा-Jandhan Account: केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स कशाप्रकारे कराल अप्लाय? तुम्ही एसबीआयचे ग्राहक असा तर एसबीआयची डिजिटल सर्व्हिस YONO एसबीआय अंतर्गत होम लोनसाठी अर्ज करता येईल. याशिवाय एसबीआयने एक नंबर 7208933140 जारी केला आहे. तुम्ही या क्रमांकावर होम लोनसाठी एक मिस्ड कॉल देऊन ही सुविधा मिळवू शकता. SBI ने याबाबत जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की वरील सुविधाव्यतिरिक्त जर तुम्ही एसबीआय योनो सर्व्हिसअंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज कराल तर तुम्हाला देखील 5 टक्के बीपीएस इंटरेस्ट कन्सेशनची सुविधा मिळेल. एसबीआयच्या या होमलोनवर 6.70 टक्के व्याज द्यावं लागेल.
First published:

Tags: Independence day, SBI, SBI bank

पुढील बातम्या