मुंबई, 11 जुलै : तुम्हाला खासगी बँकेत नोकरी करायचीय तर उत्तम संधी आहे. एक्सिस बँकेत व्हेकन्सी आहे. सेल्स एक्झिक्युटिव/सेल्स मॅनेजर (ब्राँच बँकिंग), रिलेशनशिप मॅनेजर अॅग्री बिझनेस, प्रायोरिटी बँकिंग/वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागवलेत. शैक्षणिक पात्रता सेल्स एक्झिक्युटिव/सेल्स मॅनेजर (ब्राँच बँकिंग) या पदासाठी फिल्ड सेल्समध्ये 1 ते 6 वर्षाचा अनुभव हवा. रिलेशनशिप मॅनेजर अॅग्री बिझनेस पदासाठी मॅनेजिंग लँडिंग बिझनेसमध्ये 1 ते 6 वर्षाचा अनुभव हवा. प्रायोरिटी बँकिंग/वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी मॅनेजिंग HNI क्लाइंट्स & वेल्थ मॅनेजमेंटमध्ये 1 ते 6 वर्षाचा अनुभव हवा. गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या या आहेत Top 10 Cars नोकरीचं ठिकाण बडोदा, सुरत, पुणे, गोवा, मुंबई, अहमदाबाद, राजकोट, नाशिक, जळगाव आणि नागपूर इथे आहे. या नोकरीसाठी अर्ज फी नाही. 12 आणि 13 जुलै रोजी थेट मुलाखत घेईल. बँकेच्या या https://www.axisbank.com/ वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती कळेल. बजेटनंतर आज सोनं झालं महाग, ‘हा’ आहे 10 ग्रॅमचा दर तसंच,एम्प्लाॅयी प्राॅव्हिडंट फंड आॅफ इंडिया ( EPFO )मध्ये नोकरीची मोठी संधी आहे. EPFOनं सोशल सिक्युरिटी असिस्टंट ( SSA )साठी 2,189 जागांवर भरती करण्यासाठी अर्ज मागवलेत. EPFO SSA व्हेकन्सीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 जुलै 2019. या पदासाठीचा पगार Pay Matrix Level- 4च्या अंतर्गत असेल. या पदासाठी सुरुवातीला 25,500 रुपये पगार मिळेल. हा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिला जाईल. उमेदवारांनी www.epfindia.gov.in इथे लाॅग इन करून अधिक माहिती घ्यावी. आणि काय हवं : बोल्ड अवतारानंतर प्रिया बापट नवऱ्याबरोबरच दिसणार वेबसीरिजमध्ये सध्या रोजगार वाढवले जातायत. EPFO ने एप्रिल 2018 पासूनची एम्प्लॉयमेंटची माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार जानेवारी 2018 च्या तुलनेत जानेवारी 2019 मध्ये 131% लोकांनी EPFO वर नोंद केली आहे. जानेवारी 2018 मध्ये 3.87 लाख लोकांनी EPFO वर रजिस्टर केलं होतं. बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.