मुंबई, 11 जुलै : प्रिया बापट आणि उमेश कामत यांचे फॅन्स खूप आहेत. या फॅन्ससाठी आता मोठी खुशखबर आहे. सात वर्षांनी दोघं पुन्हा एकत्र येऊन रसिकांना छान ट्रीट देणार आहेत. दोघंही झळकणार आहेत एका वेबसीरिजमध्ये. या वेबसीरिजचं नाव आहे ‘आणि काय हवं?’ मुरांबा सिनेमाचा दिग्दर्शक वरुण नार्वेकरनंच याचं दिग्दर्शन केलंय. आणि काय हवं? या सीरिजचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय. त्यात उमेश आणि प्रिया एक आनंदी जोडपं दाखवलंय. दोघांचं नुकतंच लग्न झालंय. संसारातले चढउतार, गमतीजमती दोघंही अनुभवतायत. या प्रोमोमध्ये दोघांमध्ये असलेले बंध जाणवतायत. खऱ्या आयुष्यातलं त्यांचं नवरा-बायकोचं नातं, नात्यातली सहजता या प्रोमोमध्ये जाणवते. म्हणून प्रेक्षकांना या सीरिजची उत्सुकता वाटतेय. TRP मीटर : राधिका शनायाच्या जुगलबंदीने सगळ्यांची गेली ‘हवा’, या आहेत टाॅप 5
उमेश आणि प्रियानं टाइमप्लीज या सिनेमात काम केलं होतं. त्यालाही आता सहा-सात वर्ष झाली. त्यानंतर दोघं एकत्र आले नव्हते. दादा एक गुडन्यूज आहे हे नाटक प्रियानं प्रोड्युस केलं आणि उमेशची त्यात भूमिका आहे. आपण यांना ओळखलंत का? या अभिनेत्याच्या फोटोनं Throwback ला उधाण काही दिवसांपूर्वी प्रिया बापटची सिटी आॅफ ड्रीम्स सीरिज रिलीज झाली होती. त्यातल्या प्रियाच्या बोल्ड दृश्याची चर्चाही खूप झाली.‘सिटी ऑफ ड्रिम्स’ ही तिची करिअरमधली पहिली वेबसीरिज. पहिल्याच वेबसीरिजमध्ये प्रियाचा एवढा बोल्ड अवतार अनेकांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिला अनेक प्रकारे ट्रोलही केलं गेलं.त्यांना तिनं खडसावून उत्तरंही दिली होती. या सीरिजमध्ये प्रियानं पौर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली. ते बोल्ड दृश्य चांगलंच गाजलं होतं. प्रियाला वेबसीरिजचा अनुभव असला तरी उमेश कामतची ही पहिलीच वेबसीरिज आहे. वेबसीरिजमध्ये उमेश प्रियाला गुरू मानतोय. तिच्याकडून धडे घेतोय. VIDEO : धोनीचा फोटो काढताना फोटोग्राफरलाही रडू कोसळलं