मुंबई, 25 ऑगस्ट: अवघ्या काहीच वर्षात रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशभरात एक महत्त्वाची टेलिकॉम कंपनी म्हणून स्थान मिळवलं आहे. जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही नवनवीन प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. जिओकडून अशाप्रकारे ग्राहकांना अशा ऑफर दिल्या जातात. अनेकदा रिचार्ज करायचं विसरल्याने कॉलिंग किंवा इतर कामासाठी कामाचा खोळंबा होतो. अशावेळी अनेक ग्राहक दीर्घकालीन रिचार्ज करण्यावर भर देतात. तुम्ही देखील असा एखादा प्लॅन खरेदी करू इच्छित असाल, ज्यामुळे तुम्हाला वारंवार दर महिन्याला रिचार्ज करावा लागणार नाही, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी खास आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षभराची वैधता (Jio Prepaid Recharge Validity) मिळेल. जाणून घ्या काय आहे हा धमाकेदार प्लॅन
Jio चा हा धमाकेदार प्लॅन 3,499 रुपयांचा आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये 1,000 GB पेक्षा अधिक हाय-स्पीड डेटा मिळतो. याशिवाय आणखीही काही बेनिफिट्स या योजनेअंतर्गत दिले जात आहेत. Reliance Jio च्या 3,499 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. अर्थात तुम्ही एकदा रिचार्ज केला की वर्षभर चिंता राहत नाही. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची आठवण ठेवावी लागत नाही.
हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात तेजी, खरेदीआधी तपासा आजचा सोन्याचा भाव
काय आहेत बेनिफिट्स
या प्लॅनमध्ये दर दिवशी 3GB डेटा ऑफर केला जातो, अर्थात एकूण 1,095 GB हायस्पीड डेटा मिळतो. जिओच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय दर दिवशी 100 फ्री SMS देखील मिळतात. Jio Apps चे सब्सक्रिप्शन प्लॅनसह फ्री दिले जात आहे.
हे वाचा-खूशखबर! ESIC अंतर्गत येणार 30000 रुपयांपर्यंत पगार मिळवणारे कर्मचारी?
Jio चा 1299 चा प्लॅन
याशिवाय Reliance Jio च्या 1,299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24GB डेटा मिळतो. यामध्ये देखील 365 दिवसांची वैधता आहे. जर मासिक रिचार्जच्या हिशोबाने पाहिलं तर या प्लॅनमध्ये तुमचे 118 रुपये दरमहा वाचतील. हायस्पीड डेटा संपल्यानंतर मोबाइल डेटा 64kbps या स्पीडने मिळेल. शिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळेल. शिवाय 3600 SMS आणि जिओ अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.