नवी दिल्ली, 24 ऑगस्ट: मंगळवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचांदीचे (Gold-Silver Price Today) दर वधारले आहेत. 24 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) 46 रुपये प्रति तोळापेक्षा अधिक आहेत. तर चांदीच्या दरातंही (Silver Price Today) उसळी पाहायला मिळाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,374 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 61,412 रुपये प्रति किलोग्रॅम होते. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत तर चांदीच्या कोणताही बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 170 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. यानंतर सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा जास्त आहेत. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,544 रुपये प्रति तोळा आहेत. भारतीय सराफा बाजाराच्या विरोधातील परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. याठिकाणी सोन्याचे दर कमी झाले आहेत. या घसरणीनंतर दर 1,801 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा- महिनाअखेरपर्यंत 4 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी तपासून पूर्ण करा कामं चांदीचे नवे दर चांदीच्या किंमतीत देखील आज वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 172 रुपयांनी वधारले आहेत. यानंतर चांदीचे दर 61,584 रुपये प्रति किलोवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. त्यामुळे चांदीचे दर 23.60 डॉलर प्रति औंसवर आहेत. हे वाचा- PNB मध्ये खातं असेल तर मिळेल 10 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर का वधारले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढउतार सुरू आहे. न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवर स्पॉट गोल्डची किंमत किरकोळ प्रमाणात उतरली आहे. त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 9 पैशांनी वधारले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.