सोने विकत घेणार आहात? या नियमात होऊ शकतो मोठा बदल; खरेदीआधी वाचा ही महत्त्वाची बातमी

सोने विकत घेणार आहात? या नियमात होऊ शकतो मोठा बदल; खरेदीआधी वाचा ही महत्त्वाची बातमी

सोने शुद्धतेशी निगडीत हॉलमार्किंग (Hallmarking) नियमांची डेडलाइन वाढवण्याची मागणी ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : सोने शुद्धतेशी निगडीत हॉलमार्किंग (Hallmarking) नियमांची डेडलाइन वाढवण्याची मागणी ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे. या सराफांचे असे म्हणणे आहे की, भारतासारख्या देशामध्ये सोन्याच्या शुद्धतेसाठी सोन्याचे केवळ तीन मानक पुरेसे नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेदरम्यान बाजारात समस्या उद्भवू शकतात. त्यातच कोरोनामुळे झालेल्या एकंदरित नुकसामुळे ज्वेलर्सनी हॉलमार्किंगची डेडलाइन वाढवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

गेल्या वर्षी सरकारने अशी घोषणा केली होती की, 15 जानेवारी 2021 पासून देशभरात सोन्याचे दागिने आणि आर्टिफेक्ट्सच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग अनिवार्य असेल. हॉलमार्किंग पद्धती अंमलात आणण्यासाठी आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने ज्वेलर्सना एका वर्षाचा कालावधी दिला होता. यानुसार त्यांना फक्त तीन हॉलमार्क असणारे सोनं विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. या नियमाचे पालन न केल्यास ज्वेलर्सना दंड बसू शकतो किंवा तुरुंगाची हवा देखील खावी लागेल.

(हे वाचा-Lockdownमुळे भारतातील 38% स्टार्टअप्स कंगाल, काहींकडे 1 महिन्यासाठी पैसे शिल्लक)

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउंसिलचे व्हॉइस चेअरमन आणि सेन्को गोल्ड अँड डायमण्ड्सचे सीएमडी शंकर सेन यांनी अशी माहिती दिली आहे की, 'लॉकडाऊनमुळे सराफांना तीन महिन्याची विक्री आणि इतर ऑपरेशन्समध्ये नुकसान सहन करावे लागले आहे.  विक्रीवर रुळावर आणण्यासाठी साधारण 3 ते 4 महिने लागू शकतात. अशावेळी अशी परिस्थिती उद्भावू शकते की त्यांच्याकडे काही दागिने शिल्लक राहतील की ज्यांच्यावर हॉलमार्किंग केले नाही आहे.'

(हे वाचा-India-China Rift:500 चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा CAITचा निर्णय,वाचा यादी)

ज्वेलर्सच्या मते त्यांना त्यांचा स्टॉक संपवण्यासाठी येणारे सहा महिने पुरेसे नाही आहेत. हॉलमार्किंगची सेवा देणारे देखील यासाठीची डेडलाइन वाढवण्याच्या बाजूने आहेत. दागिने व्यवसायात अजून 40 टक्के सोन्यावर हॉलमार्किंग नाही आहे.  इंडियन असोसिशन ऑफ हॉलमार्किंग सेंटर्सचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या सीझनमध्ये जवळपास अडीच महिन्यासाठी किरकोळ दागिने विक्रीमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसंच पुढील सहा महिन्यात काय होईल याचीही कुणाला कल्पना नाही आहे. आम्ही असा प्रस्ताव मांडतोय की ही डेडलाइन वाढवण्यात यावी.'

काय आहे हॉलमार्क?

सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी हॉलमार्क करण्यात येते. या प्रमाणित दागिन्यांवर बीआयएसचे चिन्ह असते. हॉलमार्कचे चिन्ह असल्यास त्या दागिन्याची शुद्धता प्रमाणित होते.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: June 17, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या