मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Lockdown मुळे भारतातील 38% स्टार्टअप्स कंगाल, 12% कंपन्यांकडे शिल्लक आहे एका महिन्यासाठी पैसा

Lockdown मुळे भारतातील 38% स्टार्टअप्स कंगाल, 12% कंपन्यांकडे शिल्लक आहे एका महिन्यासाठी पैसा

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या मोठ्या अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. या काळामध्ये अनेक स्टार्टअप्सवर देखील संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 16 जून : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या मोठ्या अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. या काळामध्ये अनेक स्टार्टअप्सवर देखील संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे. आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. स्टार्टअपसाठी भारत एक चांगले मार्केट आहे, मात्र लॉकडाऊनच्या काळात स्टार्टअप्सचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार देशातील 38 टक्के स्टार्टअप्सकडे पैसे शिल्लक राहिले नाही आहेत. तर आणखी 30 टक्के स्टार्टअप्सकडे पुढील 1 ते 3 महिने पुरेल इतकाच पैसा शिल्लक आहे. लॉकडाऊनमुळे या स्टार्टअपसमोर अशी आर्थिक हालाखीची परिस्थिती उद्भवली आहे. (हे वाचा-नोकरदार वर्गासाठी खूशखबर! EPFOच्या या निर्णयामुळे पीएफचे पैसे काढणं झालं सोपं) लोकलसर्कल्स नावाच्या संस्थेने हा सर्व्हे केला असून, कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे परिणाम जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या सर्व्हेमध्ये 28 हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी 8400 उद्योजक एसएमई स्टार्टअप्स क्षेत्रातील होते. या सर्वेक्षणात 16 टक्के लोकांनी असे सांगितले की, त्यांच्याकडे पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी पैसे शिल्लक आहेत. आणखी 12 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याकडे पुढील 1 महिन्यासाठी फक्त पैसे शिल्लक आहेत. (हे वाचा-सोमवारच्या घसरणीनंतर आज पुन्हा वधारले सोन्या-चांदीचे दर) या सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की लॉकडाऊनमुळे 4 टक्के स्टार्टअप्सनी आपला व्यवसाय बंद केला आहे. गेल्या 2 महिन्यांत बहुतेक उद्योगांची कमाई 80 ते 90 टक्क्यांनी खाली आली आहे. यामुळे या उद्योगांना बाजारात आपले अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन लागू केले. 80 दिवसांपेक्षा जास्त काळ कडक बंदोबस्त लागू केल्यामुळे तसंच संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या असल्यामुळे वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे. ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्या उद्योग तसेच स्टार्टअप्सनाही त्रास सहन करावा लागला आहे. संकलन, संपादन- जान्हवी भाटकर
First published:

पुढील बातम्या