मराठी बातम्या /बातम्या /मनी /

1 लाखांचा इन्शुरन्स आणि बरंच काही...; PM जनधन योजनेअंतर्गत बँक खात्याचे तुम्हाला माहिती नसलेले फायदे

1 लाखांचा इन्शुरन्स आणि बरंच काही...; PM जनधन योजनेअंतर्गत बँक खात्याचे तुम्हाला माहिती नसलेले फायदे

जनधन योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मोफत मिळतो.

जनधन योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मोफत मिळतो.

जनधन योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मोफत मिळतो.

नवी दिल्ली, 19 मे : देशातले सगळे नागरिक बँकिंग यंत्रणेशी (Banking System) जोडले जावेत, या उद्देशाने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 42.37 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेत (PMJDY) अगदी गरिबातली गरीब व्यक्तीही खातं उघडू शकते. हे खातं कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी आउटलेटमध्ये (बँक मित्र) उघडता येऊ शकतं. जन धन योजनेत खातं उघडण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक फायदा जीवन विमा आणि दुर्घटना-अपघाती विम्याचाही (Insurance) आहे.

जनधन योजनेअंतर्गत खातं उघडल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मोफत मिळतो. त्याशिवाय या खात्यावर 30 हजार रुपयांचा अ‍ॅक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स कव्हरही (Accidental Death Insurance Cover) मिळतो. हा विमा जनधन खात्यासाठी मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर (RuPay Debit Card) मिळतो. अर्थात, त्यासाठी पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागतात. या विम्याचा हप्ता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेकडून भरला जातो. जनधन खातं उघडण्यासाठी मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, नरेगा कार्ड यांपैकी कोणत्याही एका कागदपत्राची आवश्यकता असते.

(वाचा - महिन्याला केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करुन मिळवा 2 लाखांची पॉलिसी)

जनधन अकाउंटचे फायदे -

- खात्यात किमान शिल्लक रक्कम म्हणजे मिनिमम बॅलन्स (No Minimum Balance) ठेवण्याची गरज नाही.

- सेव्हिंग अकाउंटवर मिळतं, त्याच व्याजदराने व्याज मिळतं.

- मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा प्रत्येक खातेदाराला मिळते. (Mobile Banking)

- प्रत्येक खातेदाराला एक लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मिळतो.

- 10 हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft)

- रोख रक्कम एटीएममधून काढण्यासाठी आणि विविध दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी रुपे डेबिट कार्ड मिळतं.

- अनेक सरकारी योजनांमार्फत मिळणारे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. मध्यस्थ नसल्यामुळे संबंधित रकमेत काही गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच उरत नाही.

(वाचा - मोठी बातमी! उपचारासाठी, लसीकरणासाठी Aadhaar card अनिवार्य नाही,UIDAI कडून दिलासा)

- विमा, पेन्शन प्रॉडक्ट्सची खरेदी करणं सोपं होतं.

- देशभरात कुठेही सुलभ पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करता येतात. (Easy Money Transfer)

- पीएम किसान, श्रमयोगी मानधन यांसारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खातं (Pensio0n Account) उघडलं जातं. त्याचाही फायदा खातेदारांना होतो.

First published:

Tags: Money