जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्या बँकेतील व्यवहारावर सरकारची नजर, एक चूकही पडू शकते महागात

तुमच्या बँकेतील व्यवहारावर सरकारची नजर, एक चूकही पडू शकते महागात

इंटरनेट बँकिंग

इंटरनेट बँकिंग

तुम्ही सर्वात जास्त ऑनलाईन पेमेंट करत असाल किंवा व्यवहार करत असाल तर ही बातमी महत्त्वाची

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही जर सर्वात जास्त ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमच्या बँक खात्यावर आणि व्यवहारांवर आता GST विभागाची करडी नजर असणार आहे. तुमची एक चूक महागात पडू शकते. तुम्ही सरकारच्या आणि GST विभागाच्या नजरेत येऊ शकता आणि तुम्हाला नोटीस येऊ शकते. गुड अॅण्ड सर्व्हिस टॅक्स अथॉरिटी आता रिअल टाइम ऍक्सेससाठी टॅक्सपेयर्सच्या बँकिंग व्यवहारांवर लक्ष ठेवत आहे. बनावट पावत्या ओळखणे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट इनपुटचा वापर करणाऱ्यांना आता जरा जपूनच राहावं लागणार आहे. बनावट पावत्यांचा आधार घेऊन टॅक्स क्रेडिटमध्ये हेराफेरी केल्याचं समोर आलं आहे.

जीएसटी इन्स्पेक्टर बनली मॉडेल, आता आहे 264 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कोण आहे क्रिती वर्मा?

काही कंपन्यांनी बनावट बिलांच्या माध्यमातून पैशांचा गैरवापर आणि व्यवहार करत असल्याचं समोर आलं आहे. GST रजिस्ट्रेशन करताना टॅक्स पेयर्स केवळ एकाच खात्याबाबत माहिती देतात. प्रत्यक्षात मात्र त्यांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यामुळे बँकिंग ट्रान्झाक्शन डेटा मिळवणं कठीण होत जातं. अशा लोकांवर GST विभागाला आळा घालायचा असून आता हा डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

यामुळे जे लोक GST भरत नाहीत किंवा बिलामध्ये फेरफार करतात अथवा टॅक्स भरणं चुकवतात या सगळ्यांवर अंकुश आणणं शक्य होईल. त्या दृष्टीनं सरकार आता पावलं उचलत आहे. करचुकवेगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी, आयकर विभागाला उच्च मूल्याचे व्यवहार, संशयास्पद व्यवहार तसेच एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रोख ठेवींची माहिती मिळते.

व्यावसायिकांनी GST रजिस्टेशन कधी अन् कसं करावं? वाचा संपूर्ण डिटेल्स

कर चुकवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीनं सरकार काही पावलं उचलत आहे. त्यामुळे आता तुम्ही कुठे ऑनलाईन व्यवहार करत असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर चुकवणाऱ्यांविरोधात यावेळी सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात