मराठी बातम्या /बातम्या /देश /जीएसटी इन्स्पेक्टर बनली मॉडेल, आता आहे 264 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कोण आहे क्रिती वर्मा?

जीएसटी इन्स्पेक्टर बनली मॉडेल, आता आहे 264 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, कोण आहे क्रिती वर्मा?

कोण आहे कृती वर्मा?

कोण आहे कृती वर्मा?

क्रितीने जीमॅट परीक्षा दिली होती. त्यानंतर ती जीएसटी अधिकारी बनली होती. मुंबईत येऊन तिनं रोडीज एक्स्ट्रीम या शोमध्ये भाग घेतला होता.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: आयकर अधिकारी असलेल्या क्रिती वर्मांवर 264 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिनं वरिष्ठांचं लॉगिन क्रेडेंशियल्स वापरून पैसे कमवले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई झाल्यानंतर क्रितीनं ईडीसमोर आपला जबाब नोंदवला आहे. जीएसटी इन्स्पेक्टर असलेली क्रिती वर्मा अभिनेत्री आणि मॉडेलदेखील आहे. क्रितीनं आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत, अधिकारी असलेल्या क्रितीनं 264 कोटी रुपयांच्या 12 बोगस टीडीएस परताव्यांना मंजुरी दिली होती. तिला 2021 मध्ये आयटी इन्स्पेक्टर म्हणून बढतीही देण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम सरकारी खात्यातून ट्रान्सफर करणाऱ्या बँकेनं याबाबत तक्रार केल्यावर हे सर्व प्रकरण समोर आलं. जानेवारी 2022 मध्ये, सीबीआयनं क्रिती, अभिनेता भूषण पाटील आणि चार अनोळखी व्यक्तींची नावे घेऊन फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. क्रिती आणि भूषण रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये क्रितीच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता. यानंतर ईडीने एफआयआरच्याआधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.

    ईडीनं गेल्या महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण 70 कोटी रुपयांच्या एकूण 32 मालमत्ता जप्त केल्या आहेत. लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडुपी भागातील मालमत्ता जमिनीच्या स्वरुपात होती तर पनवेल आणि मुंबईतील मालमत्ता फ्लॅट्सच्या स्वरूपात होती. या मध्ये तीन लक्झरी कारचा (बीएमडब्ल्यू X7, मर्सिडिज GLS400d, ऑडी Q7) देखील समावेश होता. या मालमत्ता भूषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, क्रिती वर्मा आणि इतरांच्या नावावर होत्या. या पूर्वी, ईडीनं या प्रकरणात 96 कोटी रुपये असलेली विविध संस्थांची बँक खाती गोठवली होती. आतापर्यंत, ईडीनं या प्रकरणात एकत्रितपणे 166 कोटी रुपयांची मालमत्ता आणि बँक बॅलन्स जप्त केला आहे.

    डान्सच्या बदल्यात पैसे मिळवण्याचा दावा

    ईडीचं म्हणणं आहे की, बहुतेक बेकायदेशीर पैसे भूषण पाटीलच्या खात्यात पाठवले गेले आहेत. काही पैसे मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले गेले. खरेदी केलेल्या काही मालमत्ता क्रिती वर्माच्या नावावरही होत्या. क्रिती वर्मानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. तिनं सांगितलं की, रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी पाटीलसोबत तिनं डान्स केला होता. या कामासाठी तिला एक कोटी रुपये मानधन मिळाले होतं. क्रितीनं पुढे असंही सांगितलं की, 2020 च्या उत्तरार्धात एका डान्स शोदरम्यान पाटीलशी भेट झाल्यानंतर दोघांची ओळख झाली. मात्र, फसवणुकीच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सहा महिन्यांतच भूषणपासून विभक्त झाल्याचा दावा तिनं केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आरोपींविरुद्ध संबंधित माहिती देऊन एजन्सींना मदत केली आहे, असं क्रितीचं म्हणणं आहे.

    लेकाचं लग्न बाबाच्या जीवावर बेतलं! तो विषयच नको म्हणून मुलाने म्हाताऱ्या वडिलांनाच संपवलं

    वरिष्ठ कर सहाय्यकाचाही गुन्ह्यात सहभाग

    पाटीलच्या संगनमताने आयटी इन्स्पेक्टर तानाजी मंडल यांनी ही फसवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. तानाजी मंडल हे त्यावेळी वरिष्ठ कर सहाय्यक पदावर होते. त्यांनी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांचे लॉग-इन क्रेडेन्शियल्स आणि पासवर्ड शोधून काढले. पाटीलच्या कंपनीच्या खात्यातील खऱ्या आणि बोगस टीडीएसचे परतावे मार्गी लावण्यासाठी या माहितीचा वापर केला गेला.

    मोबाईल फोन वापरण्याची ही सवय सोडा, महिलेनं दृष्टी गमावली

    जीमॅट परीक्षा पास करून क्रिती झाली होती जीएसटी अधिकारी

    क्रितीने जीमॅट परीक्षा दिली होती. त्यानंतर ती जीएसटी अधिकारी बनली होती. मुंबईत येऊन तिनं रोडीज एक्स्ट्रीम या शोमध्ये भाग घेतला होता. रोडीजमध्ये क्रिती आणि सुरभी राणाच्या वादाला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर क्रितीनं बिग बॉसच्या 12 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. ती त्या सिझनमधील पहिली कॅप्टन बनली होती. खेळाचे नियम मोडण्यासाठी ती प्रसिद्ध होती. क्रिती शो जिंकू शकली नाही पण तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

    First published:
    top videos

      Tags: GST