मुंबई, 20 डिसेंबर: जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला GST नोंदणी कधी लागेल, याबाबत व्यावसायिकांच्या मनात अनेक शंका कुशंका असतात. याबाबतची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. GST हा एक कर आहे जो भारतातील उत्पादने आणि सेवांच्या पुरवठ्यावर लादला जातो. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. VAT, सेवा कर, खरेदी कर, उत्पादन शुल्क अशा पूर्वीच्या अनेक करांना बदलण्यासाठी 2017 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. भारतात जीएसटीसाठी नोंदणी मर्यादा पूर्वी 20 लाख रुपये होती. आता ती वाढवून 40 लाख रुपये करण्यात आली आहे. आता 40 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सर्व व्यवसायांना GST नोंदणी करणं आवश्यक आहे.
GST 2017 अंतर्गत नोंदणी करण्यासाठी, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांसाठी उलाढाल 10 लाख रुपये असावी. बहुतेक राज्यांमध्ये, 20 लाखांपेक्षा जास्त महसूल असलेल्या रेस्टॉरंटना जीएसटीसाठी नोंदणी करावी लागते. दुसरीकडे, विशेष श्रेणीच्या राज्यात, रेस्टॉरंटचे वार्षिक एकूण उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर जीएसटीसाठी नोंदणी करावी लागेल.
हे सर्व उत्पादक, व्यापारी आणि सेवा पुरवठादारांना लागू होते. जेव्हा व्यवसायाची एकूण उलाढाल मर्यादा विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा GST लागू होतो. कोणत्याही व्यवसायासाठी जीएसटी नोंदणी आवश्यक आहे. जीएसटी अंतर्गत नोंदणी केल्याशिवाय कोणतीही व्यावसायिक संस्था व्यवसाय करू शकत नाही. तसं केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.
हेही वाचा: SBI कडून अलर्ट! नव्या वर्षात बदलणार क्रेडिट कार्डचे नियम
जीएसटी नोंदणीचे अनेक प्रकार आहेत-
जीएसटी नोंदणीचे अनेक प्रकार आहेत. पहिला सामान्य करदाता आहे जो GST नोंदणीच्या विशेष श्रेणी अंतर्गत येतो. हे भारतात व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना लागू होते. कम्पोजिशन टॅक्सपेयर दुसऱ्या श्रेणीत येतात. कंपोझिशन टॅक्सपेअर म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्ही GST कंपोझिशन स्कीम अंतर्गत नोंदणी करणं आवश्यक आहे. यासह कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि रेसिंडेंट टॅक्सेबल पर्सनचीही श्रेणी किंवा कॅटेगरी असते.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
ही कागदपत्रे आवश्यक-
जीएसटी नोंदणीसाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रमोटर्सचा पत्ता आणि आयडी पुरावा, बँक तपशील, पासबुक, कॅन्सल चेक, व्यवसायाचा आधार पत्ता, नोंदणी प्रमाणपत्र, डिजिटल स्वाक्षरी आणि अधिकृत स्वाक्षरीचे अधिकृत पत्र आवश्यक असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.