नवी दिल्ली, 25 जून : केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return ITR) फाईल करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता आयटीआर भरण्यासाठी आणखी एका महिन्याचा कालवधी मिळेल, म्हणजेच हे काम तुम्ही 31 जुलैपर्यंत पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता 31 मार्च 2021 पर्यंत हे दोन महत्त्वाचे दस्तावेज लिंक करता येणार आहेत. कोरोना व्हायरस पँडेमिक (Coronavirus Pandemic) केंद्र सरकारने याआधी आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआरची अंतिम तारीख वाढवून 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने एका अधिसूचनेच्या माध्यमातून 2019-20 आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटी अधिनियमाच्या अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची डेडलाइन 31 जुलै, 2020 पर्यंत वाढवली आहे. (हे वाचा- सायबर हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर टेलिकॉम कंपन्या सतर्क! या’ कर्मचाऱ्यांना अधिक धोका सीबीडीटीने नुकतच असेसमेंट वर्ष 2020-21 साठी इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म 1 पासून 7 पर्यंत नोटिफाइड केले होते.
Govt extends various time limits under the Direct Tax & Benami laws, providing further relief to taxpayers for making compliances under these laws. Notification dt 24th June,2020 issued. Time limits had earlier been extended by Taxation & Other Laws Ordinance on 31st March, 2020. pic.twitter.com/xc2HgjuAzY
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 24, 2020
सेल्फ असेसमेंट टॅक्स पेमेंटच्या तारखेत बदल नाही दरम्यान, करदात्यांना सेल्फ असेसमेंट करण्याची तारीख वाढवण्यात आलेली नाही, ज्यामध्ये सेल्फ असेसमेंट टॅक्स लायबिलिटी 1 लाखापेक्षा जास्त आहे. या परिस्थिती आयकर अधिनियम 1961 मध्ये निर्दिष्ट केलेल्या तारखांपर्यंत पूर्ण सेल्फ असेसमेंट टॅक्स द्यावा लागेल आणि विलंबित देयावर आयटी आयकर कायदा कलम 234 अंतर्त व्याज देखील द्यावे लागेल. (हे वाचा- दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून व्हा लखपती, या सरकारी बँकेची फायदेशीर योजना) आयटी कायद्याच्या Chapter-VIA-B अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी विभिन्न गुंतवणुकीची तारीख ज्यामध्ये 80C (LIC, PPF, NSC आदि), 80D (मेडिक्लेम), 80G (Donation) इत्यादी वाढवून 31 जुलै 2020 करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2019-20 साठी या सेक्शन अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी 31 जुलै पर्यंत गुंतवणूक/पेमेंट केले जाऊ शकते. 2019-20 साठी इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख 31 जुलै 2020 वरून 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली होती. तर टॅक्स ऑडिटची तारीख 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. (हे वाचा- कोरोनाच्या संकटात 3 महिन्यांच्या आरोग्य विम्यालाही परवानगी; कशी असेल पॉलिसी? )