Home /News /money /

दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून व्हा लखपती, या सरकारी बँकेची फायदेशीर योजना

दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून व्हा लखपती, या सरकारी बँकेची फायदेशीर योजना

बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं. पण सध्या याबद्दल बँकांनी वेगळा निर्णय घेतलाय.

बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या रकमेवर व्याज मिळतं. पण सध्या याबद्दल बँकांनी वेगळा निर्णय घेतलाय.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची सेंट लखपती (Cent Lakhpati) ही योजना आहे. बँकेचे असे म्हणणे आहे की, तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्हाला हवं तेव्हा लखपती बनू शकता.

    नवी दिल्ली, 24 जून : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank of India) एका योजनेच्या आधारे लखपती बनण्याची संधी दिली गेली आहे. बँकेच्या या योजनेबाबत अनेकांना माहित नाही आहे. या सरकारी बँकेची सेंट लखपती (Cent Lakhpati) ही योजना आहे. बँकेचे असे म्हणणे आहे की, तुम्ही या योजनेअंतर्गत तुम्हाला हवं तेव्हालखपती बनू शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला केवळ 595 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जाणून घ्या या सेंट लखपती योजनेबाबत- सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 'जब चाहो लखपती बनो' या टॅगलाइन अंतर्गत ही योजना डिसेंबर 2016 मध्ये सुरु केली होती. या योजनेअंतर्गत 1 वर्षापासून 10 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये  लखपती बनायचे आहे, तर तुम्हाला दर महिन्याला थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल. मात्र त्यापेक्षा जास्त कालावधी देखील तुम्ही निवडू शकता. समजा 10 वर्षांपर्यंतचा कालावधी निवडल्यास तुम्ही दर महिन्याला थोडी-थोडी गुंतवणूक करून लखपती बनू शकता. (हे वाचा-मुकेश अंबानी यांच्या पगारात 12 वर्षांत एकदाही झाली नाही वाढ, वाचा किती आहे सॅलरी) या योजनेअंतर्गत बँक दोन प्रकारे व्याजदर ऑफर करते. जर एखाद्या व्यक्तीला एका वर्षामध्ये लखपती बनायचे असेत तर त्याला रकमेवर 6.65 टक्के व्याज मिळेल. तर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये जर लखपती बनायचे असेल तर त्या व्यक्तीला 6.45 टक्के व्याज दिले जाते. त्याचप्रमाणे बँक त्यांचे माजी कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांना काही खास स्कीम ऑफर करत आहे. (हे वाचा-मोठी बातमी! ऑगस्टपर्यंत नाही सुरू होणार सामान्य रेल्वे? परिपत्रकातून दिले संकेत जर तुम्हाला एका वर्षामध्ये लक्षाधीश व्हायचे असेल तर तु्म्हाला दरमहा 8040 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही ही गुंतणूक 1 वर्षासाठी केली तर तुम्हाला वर्षाअखेर बँकेकडून 1 लाख रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला 6.65 टक्के व्याज मिळेल. सेंट लखपती या योजनेअंतर्गत तुम्ही 10 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर लक्षाधीश होण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला प्रति महिना 565 रुपये द्यावे लागतील. यावर तुम्हाला 6.45 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला 5 वर्षामध्ये लक्षाधीश व्हायचे असेल तर प्रति महिना 1,411 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 5 वर्षानंतर तुम्हाला बँक 1 लाख रुपये देईल. यामध्ये तुम्हाला 6.45 टक्के व्याज मिळेल. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Central bank of india

    पुढील बातम्या