Home /News /money /

सायबर हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर टेलिकॉम कंपन्या सतर्क! Work From Home करणाऱ्यांना सर्वाधिक धोका

सायबर हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर टेलिकॉम कंपन्या सतर्क! Work From Home करणाऱ्यांना सर्वाधिक धोका

केंद्र सरकारने सायबर हल्ल्यासंदर्भात (Cyber Attack) दिलेल्या इशाऱ्यानंतर आता देशभरातील टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies in India) देखील सतर्क झाल्या आहेत.

    नवी दिल्ली, 24 जून : केंद्र सरकारने सायबर हल्ल्यासंदर्भात (Cyber Attack) दिलेल्या इशाऱ्यानंतर आता देशभरातील टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies in India) देखील सतर्क झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या नेटवर्क आणि सिस्टिमसाठी लागणारी सतर्कता वाढवली आहे. केंद्र सरकारने असा इशारा दिला होता की, येणाऱ्या काही दिवसात सायबर हल्लेखोर किंवा हॅकर कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) बहाण्याने सामान्य नागरिक किंवा व्यवसायिकांवर सायबर हल्ला करू शकतात. त्यांच्या निशाण्यावर सामान्य नागरिक आणि व्यावसायिक आहेत . त्यानंतर टेलिकॉम कंपन्या विशेष सजग झाल्या आहेत. एअरटेलने (Airtel) त्यांच्या ग्राहकांना सिक्युरिटी अॅडव्हायजरी पाठवून सांगितले आहे की, कंपनीकडून सतत काळजी घेण्यात येत आहे. पुढील 5 ते 7 दिवसांसाठी सिक्यूरिटी ऑपरेशन सेंटरला हाय रिस्क परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करण्यात आले आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी सायबर हल्ल्याची जोखीम जास्त एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार कोव्हिड-19 चे संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. अशावेळी सायबर हल्ला आणि विशेष करून फीशिंगचा धोका वाढला आहे. एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी काही सुरक्षा उपाय आत्मसात करण्यास सांगितले आहे. (हे वाचा-50 हजाराच्या जवळपास पोहोचले सोन्याचे भाव, दिवाळीपर्यंत दर 80,000 होण्याचा अंदाज) कंपनीने सांगितले आहे की, या सायबर हल्ल्यामध्ये केवळ व्यावसायिक नुकसान होणार नाही, तर तुमच्या ब्रँडचे नाव देखील खराब होऊ शकते. त्यामुळे या धोक्यापासून वाचण्यासाठी संस्थांना किंवा कंपन्यांना त्यांची सायबर प्रणाली मजबूत करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे होऊ शकतो हल्ला, असा करू शकता बचाव विविध अहवालांचा हवाला देत एअरटेलने असा इशारा दिला आहे की, ईमेल, फीशिंग, संदिग्ध वेबपेज, इंटरनेट लिंक, नेटवर्क संबंधित अन-अपडेटेड सिस्टिम आणि आयडी चोरीच्या माध्यमातून सायबर हल्ल्याची सुरुवात होऊ शकते. अशावेळी घरातून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी अँटी व्हायरस आणि अन्य सॉफ्टवेअर पॅच अपडेट करावा, असा सल्ला एअरटेल कडून देण्यात आला आहे. (हे वाचा-दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक करून व्हा लखपती, या सरकारी बँकेची फायदेशीर योजना) वोडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea) एका प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, त्यांनी देखील सतर्कतेचा स्तर उंचावला आहे. गेल्या आठवड्यात भारत सायबर सुरक्षेची नोडल एजन्सी CERT-in ने देखील संभाव्य फीशिंग हल्ल्याबाबत इशारा दिला होता. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Cyber attack

    पुढील बातम्या