जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Insurance : सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या कठीण काळात कसा येत राहतो पैसा

Insurance : सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या कठीण काळात कसा येत राहतो पैसा

सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स

सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स

नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नक्कीच विचार करते की, त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाचा खर्च कसा निघेल. याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही लाइफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. पण काही दुसरा पर्याय आहे का? तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स घेऊ शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 जून : नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नक्कीच विचार करते की त्यानंतर कुटुंबाचा खर्च कसा चालेल. अशा वेळी अनेक जण हे लाइफ किंवा टर्म इन्शुरन्स घेतात. पण याला काही ऑप्शन आहे का? तुमची इच्छा असल्यास तुम्ही सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स घेऊ शकता. ज्या अंतर्गत तुम्ही गेल्यावरही तुमच्या कुटुंबाचा पगार कायम राहील. पण हे देखील लक्षात ठेवा की, हा इन्शुरन्स प्लान तुमची नोकरी गेल्यावर तुमची सॅलरी प्रोटेक्ट करत नाही. फक्त तुमचा मृत्यू झाल्यावरच तुमच्या कुटुंबाला प्रोटेक्ट करते. हे इन्शुरन्स प्लान कसं काम करतं? सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स हा एक प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. तुम्ही हा इन्शुरन्स घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत मिळणाऱ्या विम्याच्या रकमेच्या भरणाबाबत काही पर्याय मिळतील. तुम्ही ते एकरकमी म्हणून घेऊ शकता किंवा दर महिन्याला नियमित उत्पन्न म्हणून घेऊ शकता किंवा तुम्ही एक भाग एकरकमी म्हणून आणि एक भाग नियमित उत्पन्न म्हणून घेऊ शकता. सॅलरी प्रोटेक्शन प्लान अशा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतो. ज्यांना कुटुंबाची एक लाइफस्टाइल मेंटेन ठेवायची असते. Accident Insurance : पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स म्हणजे काय? कठीण काळात कसं करतं मदत? तुम्हाला किती पगार मिळेल? तुम्ही सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स निवडल्यास, तुम्ही तुमच्या टेक-होम पगाराच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा कमी जास्तीत जास्त रक्कम निवडू शकता. या आधारावर, तुम्हाला प्रीमियम देखील भरावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही ही पॉलिसी वयाच्या 30 व्या वर्षी 15 वर्षांसाठी तुम्ही घेत आहात असं गृहित धरु. जर तुम्ही 50 हजार रुपये सॅलरीची निवड केली असेल, तर दरवर्षी विमा कंपनी काही इनक्रिमेंटही देऊ शकते. समजा पहिल्या वर्षी पगार 50 हजार असेल तर दुसऱ्या वर्षी 53 हजार, नंतर 56, नंतर 60… त्याचप्रमाणे पगार वाढतच जाऊ शकतो. Term Insurance घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिसीधारकाचा झाला मृत्यू? नॉमिनीला पूर्ण पैसा मिळेल का? सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स घेण्याचे अनेक फायदे आहेत - -यामुळे तुम्हाला महागाईपासून लढण्यास मदत मिळते. दरवर्षी महागाई वाढते आणि सॅलरी प्रोटेक्शन प्लानच्या अंतर्गत मिळणारी रक्कमही दरवर्षी वाढते. -जर तुम्ही एकट्याने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत असाल किंवा घरात एकटे कमावत असाल, तर सॅलरी प्रोटेक्शन प्लानच्या मदतीने तुम्ही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्ही नसलात तरी तुमच्या कुटुंबाची लाइफस्टाइल तशीच राहील. -तुम्ही होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल. किंवा कदाचित तुमच्या क्रेडिट कार्डवर बरीच थकबाकी आहे किंवा अनेक EMI चालू आहेत. अशा परिस्थितीत, सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स प्लान अंतर्गत व्यक्तीचे सर्व कर्ज त्याच्या मृत्यूनंतर लगेचच फेडले जाते. अशाप्रकारे त्या व्यक्तीचे कुटुंब कोणत्याही काळजीशिवाय आपले जीवन सहज व्यतीत करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात