जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Rates Today: 46000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दर, रेकॉर्ड हायपेक्षा सोनं 10000 रुपयांनी स्वस्त

Gold Rates Today: 46000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दर, रेकॉर्ड हायपेक्षा सोनं 10000 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today, September 17, 2021: शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर पाहायला मिळाले आहे. सुरुवातीच्या सत्रात सोन्यात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याच्या किंमतींवर दबाव पाहायला मिळतो आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today, September 17, 2021) काही प्रमाणात स्थिर पाहायला मिळाले आहे. सुरुवातीच्या सत्रात सोन्यात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याच्या किंमतींवर दबाव पाहायला मिळतो आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) ऑक्टोबर गोल्ड फ्युचरची किंमत सकाळी 09.15 वाजता 0.03 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 46,060 रुपये प्रति तोळावर आहेत. तर चांदीचे दर शुक्रवारी 0.25 टक्क्याने वधारले आहेत. या वाढीनंतर चांदीच्या किंमती प्रति किलो 61,231 आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी वधारले असून आज दर  $1,758.10 प्रति औंस आहेत. तर अमेरिकन गोल्ड फ्युचरची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढली असून दर $1,759.50 प्रति औंस आहेत. हे वाचा- Petrol Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीपारच! इंधनाचे भाव सामान्यांना न परवडणारे 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं गेल्यावर्षीच्या सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 56200 रुपयांवर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 46,060 रुपये प्रति तोळा आहेत. त्या तुलनेत आज सोन्याचे दर 10000 रुपयांपेक्षा जास्त दराने स्वस्त मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने मिळत असल्याने सध्या गुंतवणुकीची चांगली संधी आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर गुड रिटर्न्स वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 46,150 रुपये आणि 45,780 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचे दर 44,300 रुपये प्रति तोळा आहेत. हे वाचा- Ami Organics: 3 दिवसात पैसे डबल! या आयपीओने दिला बंपर रिटर्न 24 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,350 रुपये प्रति तोळा, मुंबईत 46,780 रुपये प्रति तोळा, चेन्नईत  48,330 रुपये प्रति तोळा तर कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,000 रुपये प्रति तोळा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात