• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीपारच! इंधनाचे भाव सामान्यांना न परवडणारे

Petrol Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीपारच! इंधनाचे भाव सामान्यांना न परवडणारे

सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज शुक्रवारी सलग बाराव्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कोणताही बदल केलेला नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज शुक्रवारी सलग बाराव्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या 5 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी इंधन दरात 15 पैशांची सवलत दिली होती. यानंतर सलग दर स्थिर आहेत. IOCL च्या मते, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लीटर आहेत. तर आज मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर आहे. दरम्यान तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन लेटेस्ट इंधनाचे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावावर विचार जीएसटीवर मंत्री समिती राष्ट्रीय दराखाली  पेट्रोलियम उत्पादनांवर कर लावण्याचा विचार करेल. यामुळे ग्राहक मुल्य (Consumers Prices) आणि सरकारच्या महसुलातील मोठ्या बदलांचे दरवाजे उघडतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती 17 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रस्तावाची तपासणी करेल. हे वाचा-Ami Organics: 3 दिवसात पैसे डबल! या आयपीओने दिला बंपर रिटर्न काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 17th Sept 2021) >> दिल्ली पेट्रोल  101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडा पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपूर पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळ पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर हे वाचा-सोन्यात गुंतवणूक करायची आहे? निवडा Gold ETF चा पर्याय, असा मिळेल फायदा SMS च्या माध्यमातून तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.  तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: