नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: आज जीएसटी (GST) कौन्सिलची बैठक (GST Council Meet) होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक (Gst Council Meeting 2021) शुक्रवारी 17 सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये होत आहे. यामध्ये चार डझनहून अधिक वस्तूंवरील कर दराचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. कोविड -19 शी संबंधित 11 औषधांवरील कर सवलत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशाचं या बैठकीकडे लागून राहिलं आहे.
Finance Minister Smt. @nsitharaman will chair the 45th GST Council meeting at 11 AM in Lucknow today. The meeting will be attended by MOS Shri @mppchaudhary besides Finance Ministers of States & UTs and Senior officers from Union Government & States.@PibLucknow pic.twitter.com/FRuGQT2Cv6
— Ministry of Finance (@FinMinIndia) September 17, 2021
सध्या पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि उपकर आकारला जातो. सद्यपरिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलवर दुहेरी कर पद्धती लागू असल्यानं मूळ किंमतीवर 100 टक्क्यांहून अधिक कर लावला जातो. ज्यात व्हॅट, उत्पादन शुल्क आणि इतर करांचा समावेश आहे. याचा फटका ग्राहकांना बसतो. या करामुळे ग्राहकांना दुप्पट पैसे मोजून इंधन खरेदी करावं लागतं. इंधनावरील एकूण कराच्या 63 टक्के वाटा केंद्र सरकारला तर 37 टक्के कर महसूल राज्याच्या तिजोरीत जमा होतो. त्यामुळे आजच्या बैठकीतून इंधनाच्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 20 महिन्यांनंतर प्रत्यक्षात बैठक आज होणारी 45 वी बैठक आहे. 20 महिन्यांच्या दिर्घ कालावधीनंतर प्रत्यक्षात ही बैठक होत आहे. याआधी लॉकडाऊनच्या आधी 18 डिसेंबर 2019 ला प्रत्यक्षात बैठक पार पडली होती. हेही वाचा- दाऊदनं जान मोहम्मदला दिली होती या बड्या गँगस्टरची सुपारी, फेल गेला प्लॅन यापूर्वी सरकारने 31 डिसेंबर 2021 पर्यंत रेमडेसीव्हीर, हेपारिन आणि अॅंटीकॉगुलंट या औषधांवर 5 टक्के सवलतीचा दर लागू केला आहे. राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या जीएसटी परताव्याबाबत देखील आज निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

)







