जाहिरात
मराठी बातम्या / मनी / एकाच पॉलिसीत लाइफ, हेल्थ अन् कार इन्शुरन्स! पाहा IRDA चा खास प्लान

एकाच पॉलिसीत लाइफ, हेल्थ अन् कार इन्शुरन्स! पाहा IRDA चा खास प्लान

इन्शुरन्स पॉलिसी

इन्शुरन्स पॉलिसी

देशात झपाट्याने इन्शुरन्स प्रोडक्ट्सचा विस्तार करण्यासाठी IRDAI एका ऑल-इन-वन विमा पॉलिसीच्या योजनेवर काम करत आहे. ज्यामध्ये एकापेक्षा जास्त जोखिमची सुरक्षा एकाच वेळी दिली जाईल आणि क्लेमला एका कॉमन इंडस्ट्री प्लॅटफॉर्मशी कनेक्ट करुन सेटलमेंट प्रोसेस सोपी केली जाईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : देशात आतापर्यंत लाइफ, हेल्थ आणि मोटर इन्शुरन्ससह इतर विमा उत्पादनांचे फायदे घेण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी घ्याव्या लागत होत्या. परंतु येत्या काही दिवसांत तुम्हाला हे सर्व फायदे एकाच पॉलिसीमध्ये मिळतील. विमा नियामक संस्था IRDAI एक अशी सिंगल पॉलिसी आणण्यावर काम करतेय, ज्यामध्ये सर्व प्रकारचे इन्शुरन्स कव्हर होतील. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या पॉलिसी घ्यावा लागणार नाहीत. म्हणजेच ही ऑल इन वन इन्शुरन्स पॉलिसी असेल.

News18लोकमत
News18लोकमत

इन्शुरन्स रेग्युलेटरची ही स्कीम सक्सेस झाल्यास देशभरातील कुटुंबांना लवकरच सिंगल पॉलिसी मिळू शकेल. आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले की, हे काम निश्चितच अवघड आहे, पण यावर चर्चा सुरु आहे. याबाबत विमा नियामक कोणत्या प्रकारची तयारी करत आहे आणि ग्राहकांना त्याचा कसा फायदा होईल ते जाणून घेऊ या.

विमा ट्रिनिटी म्हणजे काय?

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने देशातील विमा उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पुढाकार घेतला आहे. IRDAI चे ‘विमा ट्रिनिटी’ एक परवडणारे प्रोडक्ट आहे. ज्याचा उद्देश नागरिकांना सर्वसमावेशक हेल्थ, लाइफ, प्रॉपर्टी आणि अॅक्सीडेंट कव्हरेज प्रदान करणे आहे.

कार खरेदी करण्यासाठी बँकेतून लोन घेताय? मग या अटी जाणून घ्यायलाच हव्यात

द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, देश विमा उत्पादनांचा वेगाने विस्तार करण्यासाठी अशा योजनेवर काम करत आहे. ऑल-इन-वन इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकापेक्षा जास्त जोखीम संरक्षण एकत्र दिसेल जातील. क्लेम आणि एक कॉमन इंडस्ट्री प्लॅटफॉर्मसोबत कनेक्ट करुन सेटलमेंट प्रोसेस सोपी केली जाईल.

प्रत्येक वेळी मिळेल कन्फर्म तत्काळ तिकीट! ‘या’ ट्रिकने 100 टक्के मिळेल यश

सर्व सुरक्षा एकाच पॉलिसीमध्ये

आयआरडीएचे प्रमुख देवाशिष पांडा म्हणाले की, ग्राहकांच्या सर्व रिस्क एका पॉलिसीद्वारे कव्हर केल्या जाव्यात, तसेच ही पॉलिसी सर्वांना सहज उपलब्ध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. याशिवाय या पॉलिसीचा प्रीमियम कमी असला पाहिजे. तसंच क्लेम सेटलमेंटही लवकर व्हायला हवे. ते म्हणाले की, जर आमची योजना यशस्वी झाली तर देशभरातील कुटुंबांना लवकरच अशा स्वस्त सिंगल पॉलिसीची भेट मिळेल. ज्यामध्ये हेल्थ, लाइफ, प्रॉपर्टी आणि अॅक्सीडेंट कवच याबाबत सुरक्षा प्रदान केली जाईल. या पॉलिसीद्वारे क्लेम सेटलमेंट काही तासांतच होईल. सर्वसामान्यांना वेगवेगळ्या गरजांसाठी विमा पॉलिसीसाठी भटकावे लागू नये, अशी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची इच्छा आहे. एकाच वेळी, त्याने अशी पॉलिसी घ्यावी, ज्यामध्ये हेल्थ, लाइफ आणि प्रॉपर्टीसह सर्व क्षेत्रांशी संबंधित जोखीम समाविष्ट असतील आणि सर्व पॉलिसींचा प्रीमियम एकरकमी असायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात