मुंबई, 29 मे : पर्यटनाला चालना देण्यासाठी, IRCTC वेळोवेळी टूर पॅकेज लॉन्च करत असते. या पॅकेजेस अंतर्गत तुम्हाला विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. आताIRCTC ने तुमच्यासाठी दक्षिण भारतात फिरण्यासाठी खास टूर पॅकेज आणलंय. या ट्रेनचे भाडे 15,900 रुपये प्रति व्यक्ती ठेवण्यात आलंय. चला तर मग जाणून घेऊया या पॅकेजशी संबंधित महत्त्वाच्या डिटेल्स.
पॅकेजचे डिटेल्स -
पॅकेजचे नाव- दिव्य दक्षिण दर्शन यात्रा पॅकेज कालावधी- 7 रात्री आणि 8 दिवस ट्रॅव्हल मोड - ट्रेन डेस्टिनेशन कव्हर्ड- साबरमती, वडोदरा, पुणे, सोलापूर
मिळेल ही सुविधा
1. राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल. नॉर्मल किंवा डिलक्स असे दोन प्रकारची हॉटेल्स आहेत जी तुम्ही तुमच्या कंफर्डनुसार निवडू शकता. 2. लंच आणि डिनरची सुविधा मिळेल. 3. प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध असेल. 4. तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
IRCTC: फक्त 8 हजारात करा ऊटीची सैर, पाच दिवसांचं खास टूर पॅकेजप्रवासासाठी किती पैसे लागतील
1. या प्रवासात तुम्ही स्लिपर कोचमधून प्रवास केल्यास तुम्हाला 15,900 रुपये मोजावे लागतील. 2. तर 3AC मध्ये रु. 27,500 प्रति व्यक्ती चार्ज भरावा लागेल.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली-
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर तुम्ही IRCTCच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता असं सांगण्यात आलंय. IRCTC ने आणलंय खास ‘डिवाइन हिमालयन टूर’, स्वस्तात मस्त आहे पॅकेज!
असं करु शकता बुकिंग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या ऑफिशियल वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. यासोबतच, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.