IRCTC Char Dham Yatra Package : चार धाम यात्रेसाठी IRCTC ने तुमच्यासाठी टूर पॅकेज आणलं आहे. हे टूर पॅकेज याच महिन्यात सुरू होत आहे. या टूर पॅकेजच्या माध्यमातून भाविकांना स्वस्तात आणि सोयीने चारधामची यात्रा करता येणार आहे. हिंदू धर्मामध्ये चार धाम यात्रा अत्यंत शुभ मानली जाते. चार धाम यात्रेला निघालेल्या भक्ताला पुण्य मिळते आणि पापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं. यामुळे प्रत्येकाला चार धाम यात्रेला जायची इच्छा असते. IRCTC च्या चार धाम यात्रा टूर पॅकेजबद्दल जाणून घेऊया. 28 जून रोजी चेन्नई येथून सुरू होईल टूर पॅकेज IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव चारधाम यात्रा बाय फ्लाइट एक्स चेन्नई (SMA18) आहे. या टूर पॅकेज अंतर्गत भाविकांना बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ आणि यमुनोत्रीचे दर्शन दिले जाणार आहे. IRCTC चे हे चारधाम यात्रा टूर पॅकेज 28 जूनपासून सुरू होत आहे. हे टूर पॅकेज चेन्नईपासून सुरू होणार आहे. टूर पॅकेजमध्ये भाविक फ्लाइटने प्रवास करतील IRCTC च्या या चारधाम यात्रा टूर पॅकेजमध्ये भाविक विमानाने प्रवास करतील. भाविकांना स्थानिक ठिकाणी बसने प्रवास करण्याची सोय केली जाईल. आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणेच या टूर पॅकेजमध्येही रेल्वे भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल. IRCTC Tour Package: तिरुपतीपासून त्रिवेंद्रमपर्यंत, फक्त 19,620 रुपयांत 11 दिवसांच पॅकेज; सोडू नका ही संधी भाडं किती? या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 74,100 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 61,500 रुपये भाडे द्यावे लागेल. जर तुम्ही या टूर पॅकेजवर तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 60,100 रुपये भाडे द्यावे लागेल. IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी आणि त्याच्या बुकिंगसाठी, प्रवासी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. IRCTC च्या या टूर पॅकेजने स्वस्तात करुन या इंडोनेशियाची सैर! मिळणार ‘या’ सुविधा महत्त्वाचं म्हणजे, IRCTC पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस ऑफर करत असते. या टूर पॅकेजच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात आणि सोयीनुसार प्रवास करतात आणि त्याचबरोबर पर्यटनालाही चालना मिळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.