नवी दिल्ली, 27 जून : आयआरसीटीसी पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस आणत असते. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून प्रवासी स्वस्तात प्रवास करतात आणि पर्यटनालाही चालना मिळते. IRCTC केवळ देशासाठीच नाही तर परदेशातही टूर पॅकेजेस ऑफर करत असते. IRCTC च्या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. या टूर पॅकेजेसमध्ये IRCTC लोकल प्रवासासाठी कॅब किंवा बसचीही व्यवस्था करते. आता IRCTC ने पर्यटकांसाठी कुर्ग, मसुरी आणि उटीचे टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजविषयी सविस्तर माहिती घ्या जाणून… IRCTC चे हे टूर पॅकेज 6 दिवसांचे आहे IRCTC चे कुर्ग, मसुरी आणि उटी टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. टूर ऑफ साउथ वेस्टर्न व्हॅली असे या टूर पॅकेजचे नाव आहे. या टूर पॅकेज अंतर्गत पर्यटक कर्नाटक, केरळ, बंगळुरु आणि तामिळनाडूच्या पश्चिम घाटांना भेट देतील. टूर पॅकेज 10 ऑगस्टला विशाखापट्टणम येथून सुरू होईल आणि हा टूर 15 ऑगस्टला संपेल. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये प्रवास विमानातून केला जाणार आहे.IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था रेल्वे करेल. या टूर पॅकेजमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. IRCTC Tour Package: काश्मीर फिरण्याची सुवर्ण संधी! IRCTC ने स्वस्तात आणलंय जबरदस्त टूर पॅकेज IRCTC च्या या टूर पॅकेजचं भाडं किती? IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 35210 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्ही दोन व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 26650 रुपये भाडे द्यावे लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 27875 रुपये भाडे द्यावे लागेल. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बेडसह भाडे 25035 रुपये असेल. 2 वर्षे ते 4 वर्षे वयोगटातील मुलांचे भाडे 7650 रुपये आहे. IRCTC Tour Package: भारत गौरव ट्रेनने 7 ज्योतिर्लिंगांसह शिर्डीचे दर्शन घेण्याची संधी; स्वस्तात होईल देवदर्शन!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.