जर तुम्ही दक्षिण भारताची सैर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे 'भारत गौरव - दक्षिण भारत टूर, एक्स बेटिया' चालवणार आहे. या पॅकेजद्वारे तुम्हाला तिरुपती, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला भेट देण्याची संधी मिळेल. टूर पॅकेजची किंमत 19,620 रुपयांपासून सुरू होते.
IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिलीये. हे पॅकेज 22 जुलै 2023 रोजी बेतियापासून सुरू होईल. हे पॅकेज 10 रात्री 11 दिवसांचं असेल.
विशेष म्हणजे तुम्हाला फक्त पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रवासात खाण्यापिण्याची आणि राहण्याची काळजी करण्याची गरज नाही. हा प्रवास भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे.
टूर पॅकेजसाठी टॅरिफ वेगवेगळा असेल. पॅकेजची सुरुवात 19,620 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. तुम्ही स्लीपरमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला 19,620 रुपये मोजावे लागतील. थर्ड एसीमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 32,075 रुपये मोजावे लागतील.
IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.