जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IRCTC च्या या टूर पॅकेजने स्वस्तात करुन या इंडोनेशियाची सैर! मिळणार 'या' सुविधा

IRCTC च्या या टूर पॅकेजने स्वस्तात करुन या इंडोनेशियाची सैर! मिळणार 'या' सुविधा

आयआरसीटीसी इंडोनेशिया टूर पॅकेज

आयआरसीटीसी इंडोनेशिया टूर पॅकेज

IRCTC चे इंडोनेशिया टूर पॅकेज 30 जूनपासून सुरू होणार आहे. पर्यटक बालीपर्यंत विमानाने प्रवास करतील. आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज 5 जुलै रोजी संपणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : IRCTC पर्यटकांसाठी विविध टूर पॅकेजेस आणत असते. या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटक स्वस्तात आणि सुविधेसह प्रवास करतात. यासोबतच विविध राज्यांच्या पर्यटनालाही या टूर पॅकेजमधून प्रोत्साहन दिले जाते. IRCTC टूर पॅकेजद्वारे प्रवासी धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांना भेट देतात. आता IRCTC ने इंडोनेशियासाठी हवाई टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर जाणून घ्या. IRCTC चे लखनऊ ते इंडोनेशिया टूर पॅकेज 30 जूनपासून सुरू होणार आहे. पर्यटक लखनऊ ते बाली विमानाने प्रवास करतील. IRCTC चे हे टूर पॅकेज 5 जुलै रोजी संपणार आहे. हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. आयआरसीटीसीच्या इतर टूर पॅकेजप्रमाणे या टूर पॅकेजमध्येही प्रवाशांना राहण्याची आणि भोजनाची सुविधा मोफत दिली जाणार आहे. पर्यटकांना एका छान हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाईल. यासोबतच त्यांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मोफत मिळेल. IRCTC Tour Package: काश्मीर फिरण्याची सुवर्ण संधी! IRCTC ने स्वस्तात आणलंय जबरदस्त टूर पॅकेज काय काय पाहणार? IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटक उलुवातु मंदिर, उबुद कॉफी प्लांटेशन, टर्टल आयलंड आणि रॉयल पॅलेसला भेट देतील. टुरिस्ट क्रूझवर रात्रीचे जेवण आणि जंगल सफारीचा आनंद घेतली. या टूरमध्ये पर्यटक तंजुंग बेनोआ बीचलाही भेट देतील. IRCTC: फिरायला जायचा प्लान करताय? मग स्वस्तात करा बालीची सैर, IRCTC ने आणलंय खास पॅकेज किती पैसे लागणार? तुम्ही इंडोनेशियाच्या या टूर पॅकेजमध्ये दोन व्यक्तींसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 1,05,900 रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 1,15,800 रुपये भाडे द्यावे लागेल. मुलांसाठी, बेडसह भाडे 1,00,600 रुपये आणि बेडशिवाय 94,400 रुपये ठेवण्यात आले आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजचे बुकिंग ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर असेल. IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com द्वारे पर्यटक ऑनलाइन बुकिंग करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात