मिळालेल्या माहितीनुसार, सध्या, IPPB केवळ मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची सेवा देत आहे. मात्र लवकरच या नेटवर्कद्वारे मुलांची नावनोंदणी करण्याची सेवाही पुरवली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय काही बँकिंग सेवा देखील पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांकडून पुरवल्या जातात. हे वाचा-EPFO Update: कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे ही महत्त्वाची योजना UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, 'UIDAI ने आधारशीसंबंधित सेवा सुलभ करण्याच्या सततच्या प्रयत्नातून आयपीपीबी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून रहिवाशांसाठी डोअरस्टेप मोबाइल अपडेट सेवा आणली आहे. एकदा रहिवाशांचे आधार अपडेट झाले की त्यामुळे रहिवाशांना विशेष मदत होईल, यूआयडीएआयच्या बर्याच ऑनलाईन अपडेटेट सुविधा आणि अनेक शासकीय कल्याणकारी सेवांचा ते लाभ घेऊ शकतील.'Now a resident Aadhaar holder can get his mobile number updated in Aadhaar by the postman at his door step.
👉👉@IPPBOnline launched today a service for updating mobile number in Aadhaar as a Registrar for @UIDAI . pic.twitter.com/TGjiGhHPeG — PIB_INDIA Ministry of Communications (@pib_comm) July 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, Post office, Post office bank