मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Edelweiss Securities कडून गुंतवणुकीसाठी 'या' फर्मा स्टॉकची शिफारस, किती नफा होऊ शकतो?

Edelweiss Securities कडून गुंतवणुकीसाठी 'या' फर्मा स्टॉकची शिफारस, किती नफा होऊ शकतो?

Edelweiss Securities ने Ipca Laboratories वर 2530 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा कॉल दिला आहे. Edelweiss Securities ला असा विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत या स्टॉकद्वारे हे लक्ष्य सहज साध्य करता येईल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 डिसेंबर : अनेक ब्रोकरेज फर्म शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी (Share Market Investors) त्यांचं रिपोर्ट्सच्या आधारावर काही स्टॉकबाबत त्यांचं मत मांडत असतात. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail investors) गुंतवणूक करताना मदत मिळते. Edelweiss Securities अशाचे एक शेअरची शिफारस केली आहे. Edelweiss Securities ने Ipca Laboratories वर 2530 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा कॉल दिला आहे.

Edelweiss Securities ला असा विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत या स्टॉकद्वारे हे लक्ष्य सहज साध्य करता येईल. सध्या हा शेअर 2036 रुपयांच्या आसपास दिसत आहे. Ipca Laboratories ही एक भारतीय फार्मास्युटिकल बहुराष्ट्रीय कंपनी आहे. याशिवाय कंपनी API उत्पादनाच्या व्यवसायातही आहे.

ATM Cash withdrawal: 'या' तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग

Edelweiss Securities सांगतात की, गेल्या 5 वर्षांत IPCA लॅबोरेटरीज वाढ इंडस्ट्रीच्या तुलनेत दीडपट जास्त आहेत. या यशाचे श्रेय कंपनीच्या R&D ला जाते. IPCA लॅबोरेटरीजच्या व्यवस्थापनाला असं वाटतंय की इतर विभागांसह कार्डियाक थेरपी वर्टिकलमध्ये पुढे आणखी मजबूत वाढ अपेक्षित आहे. कंपनी आपला कार्डियाक थेरपी पोर्टफोलिओ आक्रमकपणे विकसित करत आहे.

Gold Price: लग्नसराईत सोनं खरेदी करताय? जाणून घ्या काय आहे गोल्ड रेट

ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की IPCA लॅबोरेटरीजचा मागील ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. कंपनी भक्कम बॅलेन्सशीट राखण्यात यशस्वी ठरली आहे. पुढील 6 महिन्यांत अचानक खर्चात झालेली वाढ सामान्य असल्याचे दिसून येईल. त्यामुळे पुढे कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. हे पाहता IPCA लॅबोरेटरीजचा दीर्घकालीन आऊटलूक खूप मजबूत दिसत आहे. हे लक्षात घेऊन, Edelweiss ने या स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवत 2530 चे टार्गेट दिले आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market