नवी दिल्ली, 4 डिसेंबर : सध्या लग्नसराईचा सीजन सुरू असून अनेक जण मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. अशात जे लोक सोनं खरेदीचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. सध्या सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन स्वस्तात मिळत आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारा जारी 3 डिसेंबर रोजी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 47544 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जो मागील वर्षातील रेकॉर्ड हाय लेवल 56,000 स्तरावरुन जवळपास 8000 रुपये कमी आहे. चांदी वायदा भाव 61,296 प्रति किलोग्रॅम आहे. कोरोनाच्या नव्या वेरिएंड ओमिक्रोनमुळे सोने दरात मागील काही दिवसांपासून सतत घसरण पाहायला मिळत आहे. काय आहे सोन्याचा भाव - IBJA च्या वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 47530 रुपये आहे. 23 कॅरेट गोल्डची किंमत 47340 रुपये आहे. आता 22 कॅरेट सोन्याचा भाव 43537 रुपये आहे. 18 कॅरेटचा 35,648 रुपयांवर पोहोचला आहे. 14 कॅरेट गोल्डचा रेट 27,805 रुपये आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
ATM Cash withdrawal: ‘या’ तारखेपासून ATMमधून पैसे काढणं होणार महाग
अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.