मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजार तेजीत; अवघ्या 15 मिनिटात गुंतवणूकदारांनी कमावले 2.75 लाख कोटी!

शेअर बाजार तेजीत; अवघ्या 15 मिनिटात गुंतवणूकदारांनी कमावले 2.75 लाख कोटी!

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल (RBI Monetary Policy Live Updates) केला नाही आहे. त्यानंतर मात्र शेअर बाजारात लगेचच मोठी उसळी आली. सेन्सेक्स 809.07 अंकांनी किंवा 1.40 टक्क्यांनी वाढल्यानंतर 58,442.72 वर व्यवहार करत होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 8 डिसेंबर : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत दिसत आहे. बुधवारी म्हणजे आजही शेअर बाजारात उंच हिरव्या कँडल दिसत आहे. आरबीआयच्या पतधोरण आढाव्याचे निकाल जाहीर करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल (RBI Monetary Policy Live Updates) केला नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर मात्र शेअर बाजारात लगेचच मोठी उसळी आली. सेन्सेक्स 809.07 अंकांनी किंवा 1.40 टक्क्यांनी वाढल्यानंतर 58,442.72 वर व्यवहार करत होता.

50 शेअर्सच्या निफ्टीमध्ये Wipro 2.56 टक्क्यांच्या वाढीसह सर्वात जास्त वाढला. ONGC, Infosys, HCL Tech, ICICI Bank, Tech Mahindra, Reliance Industries, Bharti Airtel and Bajaj Finance चे शेअर्स तेजीत आहेत.

RBI Monetary Policy Live Updates: रेपो रेटमध्ये बदल नाही, RBI चा महत्त्वाचा निर्णय

गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 2.75 लाख कोटी

HDFC लाइफ इन्शुरन्स 0.06 टक्क्यांच्या घसरणीसह हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहे. या उसळीसह, सेन्सेक्स निफ्टी इक्विटी गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत 2.75 लाख कोटी रुपये कमावले. BSE-लिस्टिंग कंपन्यांचे त्यांच्या मालमत्तेतील बाजार भांडवल 263 लाख कोटींवर पोहोचले आहे.

आज या दराने खरेदी करावं लागणार इंधन, मुंबईत अजूनही पेट्रोल 110 रुपयांवर

बँक निफ्टीत मोठी वाढ

रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणामुळे बँकिंग क्षेत्र पॉझिटिव्ह दिसून येत असून बँक निफ्टीच्या पातळीवरून याचे संकेत मिळत आहेत. RBI ने रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्याच्या घोषणेनंतर बँक निफ्टी 536.40 अंकांनी म्हणजेच सुमारे दीड टक्क्यांनी वाढून 37,154.80 वर पोहोचला आहे. 8 डिसेंबर रोजी NSE वर फक्त स्टॉक F&O बंदी अंतर्गत आहे. यामध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या नावाचा समावेश आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market