नवी दिल्ली, 08 डिसेंबर: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणताही बदल (RBI Monetary Policy Live Updates) केला नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक धोरण समितीच्या (RBI MPC) झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी दिलेल्या माहितीनुसार रेपो रेट (Repo Rate unchanged at 4%) 4 टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% वर कायम राहील. शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितनुसार एमपीसीने सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.
मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी पॉलिसी रेट सध्याच्या पातळीवर ठेवण्यास पाठिंबा दिला होता. शक्तिकांत दास म्हणाले की मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी देखील पूर्वीप्रमाणे 4.25% आहे. RBI ने 2021-22 साठी CPI महागाईचा अंदाज 5.3% वर कायम ठेवला आहे.
Monetary Policy Committee (MPC) voted unanimously to keep the policy repo rate at 4% & the stance remains accommodative. MSF rate and bank rate remain unchanged at 4.25%. Reverse repo rate also remains unchanged at 3.35%: RBI Governor Shaktikanta Das following MPC meeting pic.twitter.com/6QzXO1DHBg
— ANI (@ANI) December 8, 2021
कोविडचा सामना करण्यास तयार
शक्तिकांत दास म्हणाले की जागतिक स्पीलओव्हर व्यवस्थापित करण्यासाठी आमच्याकडे मजबूत बफर आहे आणि महागाई देखील व्यापकपणे लक्ष्यासह संरेखित आहे. आम्ही COIVD-19 चा सामना करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत.
तीन दिवस झालेल्या बैठकीत निर्णय
2021 ची शेवटची द्विमासिक एमपीसी बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. 6 डिसेंबर रोजी सुरू झालेली बैठक , आज संपली आहे. कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता रेपो दर 4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आल्याचे बहुतांश अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँकाही ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जांचेही दर वाढतात.
The projection for real GDP growth is retained at 9.5% in 2021-22, consisting of 6.6% in Q3, & 6% in Q4. Real GDP growth is projected at 17.2% for Q1 of 2022-23 and at 7.8% for Q2 of 2022-23: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/pmV5TCMnzV
— ANI (@ANI) December 8, 2021
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, GDP वाढीचा अंदाज 2021-22 मध्ये 9.5% वरच स्थिर आहे. याच Q3 मध्ये 6.6% आणि Q4 मध्ये 6% आहे जीडीपी ग्रोथ राहील. 2022-23 च्या पहिल्या Q1 साठी 17.2% आणि 2022-23 च्या Q2 साठी 7.8% GDP वाढीचा अंदाज आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.