Home /News /money /

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी! सेन्सेक्समध्ये 949 तर निफ्टीत 284 अंकांची घसरण

शेअर बाजारात पुन्हा घसरगुंडी! सेन्सेक्समध्ये 949 तर निफ्टीत 284 अंकांची घसरण

निफ्टीवरील सर्व 11 सेक्टोरल इंडेक्स लाल चिन्हात ट्रेड करत होते. IT इंडेक्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, AUTO, FMCG आणि Pharma मध्ये सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण आहे.

    मुंबई, 6 डिसेंबर : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. Sensex 949.32 अंकांनी घसरून 56,747.14 वर बंद झाला. त्याच वेळी Nifty 284.45 अंकांच्या घसरणीसह 16,912.25 वर बंद झाला. दिवसभर बाजारात विक्री दिसून आली. बँक निफ्टीचे 12 पैकी 11 शेअर्स घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्सची विक्री दिसली. निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर्स मध्ये घसरण दिसून आली. IndusInd Bank, Bajaj Finserv, TCS आणि HCL Tech या कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक पडझड झाली. या सर्व शेअर्समध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. निफ्टीवर सर्व सेक्टोरल इंडेक्स लाल चिन्हात निफ्टीवरील सर्व 11 सेक्टोरल इंडेक्स लाल चिन्हात ट्रेड करत होते. IT इंडेक्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याच वेळी, AUTO, FMCG आणि Pharma मध्ये सुमारे 1.5 टक्क्यांची घसरण आहे. सेन्सेक्स 82 अंकांनी उघडला आज सकाळी सेन्सेक्स 82 अंकांनी वाढून 57,778 वर आणि निफ्टी 17,209 वर उघडला. दिवसाच्या ट्रेडमध्ये सेन्सेक्स 56,736.55 च्या नीचांकी आणि 57,781.46 वरच्या पातळीवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 16,908.40 च्या नीचांकी आणि 17,216.75 च्या वरच्या पातळीवर पोहोचला. Multibagger Stock : 'या' केमिकल शेअरची दमदार कामगिरी, वर्षभरात 130 टक्के रिटर्न्स याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 765 अंकांनी (1.31%) घसरून 57,696 वर बंद झाला. निफ्टी 205 अंकांनी (1.18%) घसरून 17,196 वर बंद झाला. PowerGrid चे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले. कोटक बँक (Kotak Bank) आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून बंद झाले. बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता Macquarie Group चे संदीप भाटिया यांनी CNBC-TV18 शी केलेल्या बाचचितमध्ये सांगितले की, करोनाच्या अधिक संसर्गजन्य वेरिएंटचा प्रसार आणि यूएस फेडकडून लवकरच टॅपरिंग प्रोग्राम पुढे जाण्याची शक्यता यामुळे भारतीय बाजारातील आणखी कमजोरी कायम राहण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विविध कारणांमुळे मोठी आवक झाली. हे पाहता वॅल्युएशनमध्ये सुधारणा आधीच अपेक्षित होती. पुढे म्हणाले की, बजेटपर्यंत निफ्टी एकतर रेंज बाऊंड राहील किंवा तो 1000 अंकांनी घसरेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या