नवी दिल्ली, 26 जुलै : जास्तीत जास्त गुंतवणुकदार कोणत्याही म्युच्युअल फंडची निवड हे त्याच्या मागील प्रदर्शनाच्या आधारावर किंवा फंड मॅनेजर किंवा फंड हाउसचं नाव पाहून करतात. अनेक लोक तर अशाच फंडची निवड करतात जे सध्याच्या काळात बाजारात टॉपवर असतात. आता तुम्ही विचार करत असाल की, असं कोणी करत असेल तर त्यात चूक काय?
खरंतर बहुतेक एक्सपर्ट देखील यावर विश्वास ठेवतात. परंतु, भूतकाळातील कामगिरी पाहता, तज्ज्ञ किंवा फंड हाऊस कधी कधी चांगले काम करतात आणि कधी कधी करत नाहीत अशी चक्रे नेहमीच असतात. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही अशा 3 घटकांवर भर द्यावा जे तुमचे पैसे कोणत्याही प्रकारे बुडू देणार नाहीत. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही केवळ म्युच्युअल फंडात एक्सपर्ट बनणार नाही तर तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीवर पैशांचा पाऊस पडू लागेल. गुंतवणुकीची योग्य प्रोसेस दीर्घ काळात यश मिळवण्यासाठी एक मजबूत प्रक्रिया अवलंबणे कोणत्याही गुंतवणुकदाराची सर्वात पहिली गरज आहे. प्रोसेस योग्य प्रकारे फॉलो केली तर तुमचे पैसे बुडण्याची शक्यता शून्य होईल. चांगले गुंतवणुकदारही अनेकदा चूकतात. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने नुकतंच सांगितलं की, जर गुंतवणुकीच्या प्रोसेसवर योग्य निगरानी केली तर बाजारातील चढ-उतार पार करत प्रत्येक गुंतवणुकीवर रिटर्न कमावले जाऊ शकते. LIC Policy: 250 रुपयांची रोज बचत, मिळतील 52 लाख! LIC च्या या योजनेत होतो फायदाच फायदा रिस्क मॅनेजमेंटनेच चांगले रिटर्न गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी, जोखीम व्यवस्थितपणे व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. उच्च जोखीम संभाव्यत: उच्च रिटर्नशी संबंधित असते आणि कमी जोखिम कमी रिटर्नशी संबंधित असते. त्यामुळे चांगल्या गुंतवणुकीसाठी जोखीम व्यवस्थापन हे महत्त्वाचे पॅरामीटर बनते. बाजारातील अस्थिरता, क्रेडिट रिस्क, व्याजदर आणि महागाई यांच्याशी संबंधित जोखीम असू शकतात. निप्पॉन फंड हे सर्व जोखिम सिक्योरिटी लेव्हलसह पोर्टफोलिओ लेव्हलवरही खूप काळजीपूर्वक हाताळते. यामुळे कोणतीही गुंतवणूक बुडण्याचा धोका कमी होतो. SBI vs Post Office FD: एसबीआय की पोस्ट ऑफिस? कुठे एफडी केली तर होईल जास्त फायदा? प्रत्येक वेळी बाजारावर लक्ष आणि सतत प्रयत्न जास्त रिटर्नच्या मागे पळण्याऐवजी, सुज्ञ गुंतवणूकदाराने स्थिर आणि नियमित रिटर्न मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे दोन कारणांसाठी आवश्यक आहे. एक म्हणजे स्थिर आणि प्रक्रिया-चालित पद्धतीने गुंतवणूक करणे, जे दीर्घकाळासाठी गुंतवणूकदारांसाठी अधिक चांगले आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड देखील अशाच प्रकारे कार्य करते की तो स्टॉक किती चांगला आहे यापेक्षा त्याचे ओव्हरवेट असण्यावर अधिक लक्ष देते.