जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LIC Policy: 250 रुपयांची रोज बचत, मिळतील 52 लाख! LIC च्या या योजनेत होतो फायदाच फायदा

LIC Policy: 250 रुपयांची रोज बचत, मिळतील 52 लाख! LIC च्या या योजनेत होतो फायदाच फायदा

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी

LIC Policy: जीवन लाभ योजनेमध्ये, गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि मुदत निवडण्याचा ऑप्शन मिळतो. रोज 250 रुपये दराने 52 लाख रुपये मिळवण्यासाठी, एखाद्याला 25 वर्षांची पॉलिसी टर्म निवडावी लागेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

LIC Jeevan Labh Policy: देशात जीवन विमा पॉलिसीसाठी एलआयसी प्लान सर्वात लोकप्रिय आहेत. भारतीय जीवन विमा निगमही लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पाहून अनेक प्रकारचे प्लान ऑफर करते. LIC ची जीवन विमा पॉलिसी सध्या खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये विमा आणि बचत दोन्हींचा लाभ मिळतो. ही एक एंडॉवमेंट योजना आहे, ज्यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर बोनससह एकरकमी रक्कम दिली जाते. तुम्ही LIC च्या जीवन लाभ प्लॅन 936 मध्ये विविध उद्दिष्टांसह गुंतवणूक करू शकता. आजकाल या पॉलिसीबद्दल चर्चा आहे की याद्वारे तुम्ही दरमहा केवळ 7,572 रुपये बचत करुन मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळवू शकता. चला सांगू कसे? जीवन लाभ योजनेची वैशिष्ट्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन लाभ योजनेमध्ये, गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि मुदत निवडण्याचा ऑप्शन मिळतो. या प्लॅनमध्ये, पॉलिसी धारक मॅच्युरिटीपर्यंत टिकून राहिल्यास, त्याला विमा रक्कम आणि बोनससह इतर फायद्यांसह मोठी मॅच्युरिटी रक्कम मिळते. दुसरीकडे, विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, नॉमिनीला विमाराशी आणि बोनस दिला जातो. LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन! रोजचे 250 रुपये भरुन 52 लाख कसे मिळतील? जीवन लाभ पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 59 वर्षे आहे. समजा, 25 वर्षे वयाच्या व्यक्तीने 25 वर्षांच्या मुदतीसाठी जीवन लाभ पॉलिसी घेतली, तर त्याला दरमहा रु.7400 किंवा रु.246 प्रतिदिन गुंतवावे लागतील. त्यानुसार, ही रक्कम वार्षिक 86,954 रुपये असेल आणि मॅच्युरिटीवर त्याला 52,50,000 लाख रुपये मिळतील. यामध्ये सम अ‍ॅश्युअर्ड आणि रिव्हर्शनरी बोनस आणि फायनल अ‍ॅडिशनल बोनसचा लाभही मिळतो. तसंच, बोनसचा दर बदलत राहतो. त्यामुळे मॅच्योरिटीवर मिळणारी रक्कम बदलू शकते. LIC Policy : ‘या’ पॉलिसीमध्ये महिन्याला करा 833 रुपयांची गुंतवणूक, मिळतील कोट्यवधी! मुलांच्या नावावरही खरेदी करता येते पॉलिसी या योजनेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही योजना लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत उपलब्ध आहे. 8 ते 59 वयोगटातील कोणताही नागरिक जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करू शकतो. विमाधारक 10, 13 आणि 16 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी पैसे जमा करू शकतात. तर, 16 ते 25 वर्षांच्या कालावधीत मॅच्योरिटी झाल्यास पैसे दिले जातात. 59 वर्षांची व्यक्ती 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते, जेणेकरून त्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त नसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात