नवी दिल्ली, 06 जानेवारी: वर्ष 2020 मध्ये अनेक कंपन्यांनी आयपीओ (IPO) लाँच केले आहेत. या सर्व आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना (Investors) चांगला फायदा झाला आहे. आता नवीन वर्षातही अनेक कंपन्यांनी आयपीओ आणण्याची योजना आखली आहे. जानेवारी महिन्यातच सहा आयपीओ येण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये एकूण 16 आयपीओ बाजारात आले होते. त्यापैकी SBI Card चा आयपीओ मार्च महिन्यात आला होता. याशिवाय अन्य कंपन्यांचे आयपीओ दुसऱ्या सहामाहीत आले होते.
आयपीओच्या माध्यामातून कंपन्यांनी तब्बल 31 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभारले. यावर्षी शेअर बाजाराचा कल सकारात्मक असल्यानं कंपन्या पहिल्याच सहामाहीत आयपीओ आणण्याची योजना आखत आहेत. 24 कंपन्यांनी सेबीकडे (SEBI) आयपीओसाठी अर्ज केला आहे.
कोणकोणते आयपीओ होणार लाँच?
मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, यंदा इंडियन रेल्वे फायनान्स कार्पोरेशन (IRFC), कल्याण ज्वेलर्स, एसएसएफबी (SSFB), ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक (ESAF Small Finance Bank), इंडिगो पेंटस, ब्रूकफिल्ड आरआयईटी, बार्बेक्यू नेशन आणि रेलटेल आदी कंपन्या आपले आयपीओ बाजारात दाखल करणार आहेत.
(हे वाचा-IT च्या चौकशीनंतर रॉबर्ट वाड्रांनी केंद्राबाबत उपस्थित केले सवाल, म्हणाले...)
दरम्यान जानेवारी महिन्यात इंडिगो पेंटस, होम फर्स्ट फायनान्स कंपनी, आय आरएफसी, ब्रूकफिल्ड आरआयईटी आणि रेलटेल यांचे आयपीओ येण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या तिमाहीत सुधारणार अर्थव्यवस्था
मेहता इक्विटीजच्या प्रशांत तापसे यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी शेअर बाजारात चांगली तेजी राहण्याची शक्यता आहे. याशिवाय तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल चांगले आल्यावर अर्थव्यवस्थेतही तेजी येण्याची शक्यता आहे.
अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि शेअर बाजारातील तेजीचे संकेत यामुळे आयपीओ मार्केटमध्येही तेजी राहण्याची आशा आहे. अलीकडेच आलेल्या बर्गर किंगच्या आयपीओलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एंजल ब्रोकिंगचे केशव लाहोटी यांच्या मते आयपीओला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळं यंदाही अनेक कंपन्या आयपीओ आणण्याचा विचार करत आहेत.
कोणती कंपनी किती रुपयांचा आयपीओ आणणार?
इंडियन रेल्वे फायनान्स कार्पोरेशन (IRFC) : 4600 कोटी
कल्याण ज्वेलर्स : 1700 कोटी
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : 400 कोटी
ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक : 1000 कोटी
लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज : 800 कोटी
इंडिगो पेंट्स : 1000 कोटी
क्राफ्ट्समन ऑटोमेशन : 150 ते 180 कोटी
ब्रूकफिल्ड आरईआयटी : 4000 ते 4500 कोटी
बार्बेक्यू नेशन : 1000 ते 1200 कोटी
(हे वाचा-LPG जाहिरातीच्या नावाखाली 10 कोटींची लूट, बिहारी टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश)
अपीजेय सुरेंद्रा पार्क हॉटेल्स : 1000 कोटी
होम फर्स्ट फायनान्स कंपनी : 1500 कोटी
एसएएमएचआय हॉटेल्स : 2000 कोटी
श्याम स्टील : 500 कोटी
अन्नाय इन्फ्रा डेव्हलपर्स : 200 कोटी
रेलटेल : 700 कोटी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Personal finance