नवी दिल्ली, 06 जानेवारी: प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी बेनामी संपत्ती प्रकरणी कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची दोन दिवस चौकशी केली. यानंतर त्यांनी केंद्र सरकारबाबतीत काही सवाल वाड्रा यांनी उपस्थित केले आहेत. न्यूज18 शी त्यांनी बातचीत केली, यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, सरकारी एजन्सींचा चुकीचा वापर होत आहे आणि त्यांना दरवेळी लक्ष्य केलं जात आहे.
सध्या सुरू असलेल्या शेतकर्यांच्या विरोधादरम्यान प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या चौकशीबाबतही वाड्रा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यूज 18 शी बोलताना वाड्रा म्हणाले की, 'प्रियांका शेतकऱ्यांविषयी बोलतात आणि प्रत्येक वेळी मला लक्ष्य केले जाते. यावरून केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे.' ते म्हणाले की, 'प्रत्येक वेळी चौकशी करणाऱ्या एजन्सीने बोलावल्यानंतर मी सहकार्य केले आहे, पण मला वाटते की सरकारी संस्था चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत.'
(हे वाचा-भाड्याच्या घरात राहत असल्यास आयकरामध्ये मिळेल सूट, जाणून घ्या कसा होईल फायदा)
रॉबर्ट वाड्रां यांची सोमवारी आठ तास चौकशी केली गेली आणि बेनामी मालमत्ता व्यवहार प्रकरणात त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला. त्यांनी न्यूज 18शी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'मी विविध एजन्सींना 2,300 हून अधिक कागदपत्रे दिली आहेत. ईडीच्या दिल्ली कार्यालयात 13 वेळा गेलो आहे. ते मला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतात, सर्व उत्तरं रेकॉर्डवर आहेत.'
दरम्यान यावेळी राहुल गांधींनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावे की नाही असे विचारले असता ते म्हणाले की, 'राहुल गांधींमध्ये देशाला पुढे नेण्याची क्षमता आहे. राहुल गांधी हे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख व्हावेत अशी माझी इच्छा आहे, मी त्यांचे अभिनंदन करतो.'
(हे वाचा-भारतीय अर्थव्यवस्थेत 2021 मध्ये 9.6 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज- जागतिक बँक)
उत्तर प्रदेशच्या बदायूं बलात्कार प्रकरणाबद्दल वाड्रा यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, अशा प्रकारच्या घटनांमुळे ते दु: खी झाले आहेत आणि त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार धरले. ते म्हणाले की 'जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. यूपीमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली आहे. आरोपींना नेहमीच असे वाटते की असे काम करून ते जिवंत राहतील.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.