मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक?

कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक?

यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे.

यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे.

यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर: ऑटोमोबाइल कंपोनेंट बनवणाऱपी कंपनी Sansera Engineering लवकरच तुम्हाला कमाईची संधी देणार आहे. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे. कंपनीने याकरता प्राइस बँड देखील निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये जवळपास 1.72 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील.

कंपनीने यावर्षी जूनमध्ये या आयपीओसाठी मार्केट रेग्युलेटर सेबीकडे (SEBI) ड्राफ्ट पेपर्स सबमिट केले होते. सेबीने या कंपनीला आयपीओकरता ऑगस्टमध्ये मंजुरी देखील दिली होती. त्यानुसार कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये येत आहे. कंपनीने यआधी 2018 मध्ये आयपीओसाठी पेपर सबमिट केले होते, पण त्यावेळी मंजुरी मिळाली नव्हती. आयपीओसाठी  ICICI सिक्योरिटीज, IIFL सिक्योरिटीज आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी लीड मॅनेजर आहेत.

हे वाचा-'लेट लतिफ' ट्रेनला बसला 30000 रुपयांचा दंड! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

IPO बाबत महत्त्वाचे मुद्दे

>>या आयपीओच्या इश्यूसाठी 734-744 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

>>आयपीओकरता 20 शेअर्सची लॉट साइझ असणार आहे.

>> प्राइस बँडच्या हिशोबाने एका लॉटसाठी गुंतवणुकदाराना साधारण 14880 रुपये गुंतवावे लागतील

>> गुंतवणूकदार 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान यात पैसे गुंतवू शकतात.

हे वाचा-सरकारी योजनेत 12 हजार द्या आणि 4 कोटी मिळवा! RBI चा असा मेसेज आला आहे का?

जाणून घ्या कंपनीविषयी..

Sansera Engineering ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह सेक्टर्ससाठी काँप्लेक्स आणि क्रिटिकल प्रेसिशन इंजीनिअर्ड कंपोनेंट्स  तयार करते. सध्या कंपनीचे देशभरात 15 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. यापैकी 9 बंगळुरूमध्ये आहेत. याशिवाय कंपनीचे प्लांट्स कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आहेत. या कंपनीचा एक प्लांट स्वीडनमध्ये देखील आहे. कंपनीचा 65 टक्के महसूल भारतातून येतो तर 35 टक्के इतर देशातून. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचं उत्पन्न वाढून 1,572.36 कोटी झालं होतं. नेट प्रॉफिटमध्ये  109.86 कोटींची वाढ झाली होती.

First published: