नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: अलीकडच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करताना (Investment in Gold) फिजिकल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी डिजिटल गोल्डचा विचार केला जातो. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकार (Modi Government Scheme) सोन्यामध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देत आहे. सोमवारपासून पुन्हा एकदा तुम्हाला सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये पैसे गुंतवता येतील. सरकारी सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 (Sovereign Gold Bond Scheme 2021-22) चा आठवा हप्ता 29 नोव्हेंबरपासून ओपन होत आहे. काय आहे गोल्ड बाँडची किंमत? या हप्त्यासाठी सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत 4,791 प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. सरकारने रिझर्व्ह बँकेसह विचार विनीमय करून ऑनलाइन अप्लाय करणाऱ्यांसाठी आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे पेमेंट्स केल्यास 4,741 रुपये प्रति ग्रॅमने रक्कम मोजावी लागेल. हे वाचा- SBI ला मोठा झटका! RBI ने ठोठावला 1 कोटी रुपयांचा दंड, हे आहे कारण 3 डिसेंबरला बंद होईल योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही माहिती दिली. ही योजना 29 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 3 डिसेंबर रोजी बंद होईल. बाँडसाठी अर्ज 29 नोव्हेंबरपासून पाच दिवसांसाठी देता येईल. सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. त्यामुळे यात सॉव्हरेन गॅरंटी असते. हे बाँड खरेदी करताना ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, ज्याप्रमाणे मार्केटमध्ये सोने खरेदी करताना प्रक्रिया करावी लागते. 2015 मध्ये सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सुरू केली होती. हे वाचा- पेट्रोलच्या किमती स्थिर मात्र अद्यापही शंभरीपार! प्रति लीटर किती किंमत? तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता. सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीशी संबंधित असते आणि एक्सचेंजेसवर ट्रेडेबल असते. भौतिक सोने (Physical Gold) लॉकर इत्यादी सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे अशाप्रकारच्या सोन्याच्या चोरीची भीती देखील असते. परंतु SGB मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही ते लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च आणि चोरीचा धोका टाळू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.