Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: पेट्रोलच्या किमती स्थिर मात्र अद्यापही शंभरीपार! मुंबईत 1 लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol-Diesel Price Today: पेट्रोलच्या किमती स्थिर मात्र अद्यापही शंभरीपार! मुंबईत 1 लीटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे.

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी जारी केलेल्या नव्या इंधनाच्या दरानुसार (Fuel Rate Today) आजही दर जैसे थे च आहेत. आज पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या जवळपास महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. मात्र काही शहरात पेट्रोल नव्वद रुपयांपेक्षाही कमी किमतीत प्रति लीटर मिळत आहे. मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. हे वाचा- Personal Loan की Auto Loan? कोणतं कर्ज आहे तुमच्यासाठी चांगलं? जाणून घ्या फरक लवकरच स्वस्त होणार इंधन पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार योजना आखत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून 50 लाख बॅरल तेल काढण्याची योजना आखत आहे. काय आहेत इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 26th November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर >> पोर्ट ब्लेअर पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर हे वाचा-या नागरिकांसाठी सर्वात फायद्याची आहे RD, या प्रकारांमध्ये करता येईल गुंतवणूक दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या