• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • वर्षभरात 1 लाखाचे झाले 57 लाख रुपये, हा शेअर विकत घेणं ठरेल फायद्याचं

वर्षभरात 1 लाखाचे झाले 57 लाख रुपये, हा शेअर विकत घेणं ठरेल फायद्याचं

समजा जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी आदित्य व्हिजनमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, आणि ते अजूनही होल्डवर ठेवले असतील; तर आज त्या एक लाख रुपयांचे तब्बल 57.30 लाख रुपये झाले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली 02 ऑगस्ट : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market investment) करुन कित्येक लोक लखपती झाले आहेत. तुम्हीही जर शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक करुन लखपती व्हायचा विचार करत आहात, तर आम्ही तुम्हाला आज एका खास स्टॉकबद्दल सांगणार आहोत. या मल्टिबॅगर स्टॉकचं (Multibagger Stock) नाव आहे, आदित्य व्हिजन. यामध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे आज 57 लाख रुपये झाले आहेत. मार्केट तज्ज्ञांनी सांगितले, की 2021 मध्ये शेअर मार्केटने गुंतवणुकदारांना मालामाल केलं आहे. आदित्य व्हिजन (Aditya Vision) या बीएसई लिस्टेड कंपनीने वर्षभर आपल्या गुंतवणुकदारांचा फायदा कायम ठेवला आहे. तसेच पाच वर्किंग डेज पैकी चार दिवस हा शेअर ग्रीन इंडेक्सवर बंद झाला आहे. Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट आदित्य व्हिजन हा बीएसई एसएमई (BSE SME) लिस्टेड स्टॉक आहे. 2016 साली डिसेंबरमध्ये हा स्टॉक लिस्ट झाला होता. बिहारमधील या रिटेलर स्टॉकची किंमत आज पाच टक्क्यांनी घसरलेली पहायला (Aditya Vision Share price) मिळेल. पण, मागील पाच व्यापार सत्रांमधील याचा आलेख पाहिला; तर याची किंमत 1286.90 रुपयांनी वाढून 1415.20 रुपयांपर्यंत (Aditya Vision share growth) पोहोचली आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी आदित्य व्हिजनच्या एका शेअरची किंमत केवळ 607.20 रुपये होती; जी आता 1415.20 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या शेअरच्या किंमतीमध्ये एका महिन्यात तब्बल 133 टक्के वाढ (Aditya Vision Share future) झाली आहे. एवढंच काय, तर सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत अवघी 81.45 रुपये होती. म्हणजेच आतापर्यंत यामध्ये तब्बल 1637 टक्के वाढ झाली आहे. पुढील 48 तासांत PPF खात्यात पैसे जमा केल्यास मिळेल अधिक फायदा,अन्यथा होईल नुकसान एका वर्षात 5630 टक्के रिटर्न गेल्या वर्षी आदित्य व्हिजन स्टॉकच्या एका शेअरची किंमत 24.70 रुपये होती. आज याची किंमत 1415.20 एवढी आहे. म्हणजेच, एका वर्षामध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 5630 टक्के रिटर्न (Aditya Vision Share percentage) दिले आहेत. ही टक्केवारी समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूयात. समजा पाच दिवसांपूर्वी जर कोणी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचे जवळपास 1.10 लाख रुपये झाले असतील. याचप्रमाणे जर एका महिन्यापूर्वी कोणी एक लाख गुंतवले असतील, तर आज त्या एक लाख रुपयांचे 2.33 लाख रुपये झाले आहेत. तर, समजा कोणी सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे आजच्या घडीला 17.37 लाख रुपये झाले असतील. एका वर्षात एका लाखाचे झाले 57 लाख आकडेवारीनुसार, समजा जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी आदित्य व्हिजनमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, आणि ते अजूनही होल्डवर ठेवले असतील; तर आज त्या एक लाख रुपयांचे तब्बल 57.30 लाख (One lakh turned into 57 lakh) रुपये झाले आहेत. अशा प्रकारे दूरदृष्टीने आणि अभ्यासाने एखाद्या छोट्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करुन तुम्हीही एका वर्षात लखपती होऊ शकता.
First published: