• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा दर (Gold price today) 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : सोनं-चांदी (Gold-Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. भारतात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX (Multi commodity exchnage) आज सोन्याचा दर (Gold price today) 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं आहे. तर चांदी (Silver price today)0.3 टक्के घसरणीसह 67865 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. मागील सत्रात सोने दरात जवळपास 400 रुपये म्हणजेच 0.75 टक्क्यांची घसरण झाली होती. तसंच चांदीच्या दरातही 0.5 टक्के घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरण झाली आहे. मागील वर्षी 2020 मध्ये MCX वर याच काळात 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 56,200 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होता. तर आज MCX वर सोन्याचा दर 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या उच्चांकी दरावरुन सोनं अद्यापही 8274 रुपये स्वस्त दरात आहे.

    अर्थ मंत्रालय दरमहा देतंय 1.30 लाख रोखरक्कम? वाचा सविस्तर

    EMI गोल्ड - AUGMONT- EMI वर ज्वेलरी खरेदी करण्याचा पर्याय देतो. Augmont कडून EMI वर सोनं खरेदीचा पर्याय असून यासाठी सुरुवातीला 20 टक्के डाउन पेमेंट करावं लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर EMI फिक्स्ड होतो. यासाठी ग्राहकांना कोणतीही अॅडिशनल कॉस्ट भरावी लागत नाही. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

    30 मिनिटंही अधिक काम केलं तरी मिळणार Overtime चे पैसे, मोदी सरकार आणणार हा नियम

    अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
    Published by:Karishma
    First published: