• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • पुढील 48 तासांत PPF खात्यात पैसे जमा केल्यास मिळेल अधिक फायदा, अन्यथा होईल नुकसान

पुढील 48 तासांत PPF खात्यात पैसे जमा केल्यास मिळेल अधिक फायदा, अन्यथा होईल नुकसान

दर महिन्याला जर तुम्ही ठराविक तारखेपूर्वी PPF खात्यात रक्कम जमा केली, तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो. त्या तारखेनंतर पैसे टाकले तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं.

  • Share this:
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टींना सध्याच्या जीवनात प्रचंड महत्त्व निर्माण झालं आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना आर्थिक बचतीचं महत्त्व समजलं आहे. बचत केली तरीही पैसे गुंतवायचे कुठे हा प्रश्न असतो त्यासाठी एक सर्वोत्तम सरकारी पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund PPF) मध्ये केलेली गुंतवणूक. या खात्यात तुम्हाला चांगलं व्याज मिळतंच, पण मुद्दल आणि व्याज दोन्हीही करमुक्त असतं. दर महिन्याला जर तुम्ही ठराविक तारखेपूर्वी या खात्यात रक्कम जमा केली, तर तुम्हाला जास्त फायदा मिळतो. त्या तारखेनंतर पैसे टाकले तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं. व्याज आहे करमुक्त - पीपीएफ खातं तुम्हाला कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडता येतं. तुम्ही आपल्या नावे किंवा मुलांच्या नावे हे खातं उघडू शकता. हिंदू एकत्र कुटुंबाला (Hindu United Family) पीपीएफ खातं उघडता येत नाही, तसंच या योजनेत तुम्ही संयुक्त म्हणजे जॉइंट अकाउंटही (Joint Account) उघडू शकत नाही. या खात्यामध्ये तुम्ही वर्षाला किमान 500 रुपयांपासून जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. गुंतवलेल्या रकमेवर सेक्शन 80C अंतर्गत करसूट मिळते. तसंच त्यावर मिळणारं व्याजही करमुक्त (Tax Free Interest)असतं. 15 वर्षांनी हे खातं मॅच्युअर झाल्यावर मिळणारी पूर्ण रक्कमही करमुक्त असते. वेळेत भरा रक्कम नाहीतर होईल तोटा - दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी जर तुम्ही तुमची ठरलेली रक्कम पीपीएफ खात्यात (PPF Account) जमा केली तर तुमचा फायदा होतो. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार या खात्यातील गुंतवणुकीवर दर महिन्याच्या 5 तारखेपासून पुढच्या दिवसांसाठी व्याज मोजलं जातं. त्यामुळे जर आपण 5 तारखेपूर्वी आपली रक्कम खात्यात जमा केली तर आपल्याला चांगलं व्याज मिळतं. जर 5 तारीख उलटून गेली तर आपलं त्या महिन्यातलं नुकसान होतं. पीपीएफमध्ये दरमहा व्याज दिलं जातं त्यामुळे वेळेत रक्कम जमा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत जाऊन किंवा पोस्टात (Post Office) जाऊन पैसे जमा करणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाइन पर्यायांचा वापर करू शकता.

अर्थ मंत्रालय दरमहा देतंय 1.30 लाख रोखरक्कम? वाचा सविस्तर

ऑनलाइन पर्याय - पीपीएफ खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम (ECS Electronic Clearing Service) या सेवेचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत ईसीएसच्या पर्यायासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुमची ही सेवा सुरू झाली की बँकेतल्या तुमच्या दुसऱ्या खात्यातून दर महिन्याला ठराविक तारखेला तुम्ही निश्चित केलेली रक्कम तुमच्या पीपीएफ खात्यात आपोआप जमा होत राहील. म्हणजे कोणत्याही कारणास्तव तुमची तारीख चुकणार नाही.

5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत

आणखी एक पर्याय म्हणजे तुम्ही नेट बँकिंग सुविधेच्या माध्यमातून NEFT (National Electronic Funds Transfers) द्वारे तुमची रक्कम पीपीएफ खात्यात भरू शकता. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला पीपीएफ खाते क्रमांक आणि ज्या बँकेत पीपीएफ खातं आहे त्या बँकेचा IFS कोड माहीत असणं गरजेचं आहे. याहून सोपा पर्याय म्हणजे जर तुमचं बचत आणि पीपीएफ खातं एकाच बँकेत असेल तर सर्वांत उत्तम. तुम्ही बचत खात्यातून सहज पीपीएफ खात्यात रक्कम पाठवू शकता.
First published: