• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3% वाढीआधी मिळणार हे 5 मोठे फायदे; वाचा सविस्तर

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना DA मध्ये 3% वाढीआधी मिळणार हे 5 मोठे फायदे; वाचा सविस्तर

7 व्या वेतन आयोगानुसार (7th pay commission latest update) लवकरच महागाई भत्त्यात (Dearness Allowance-DA) 3 टक्के वाढ मिळणार आहे. आगामी सणासुदीच्या (Festival season) काळापूर्वी मिळणाऱ्या या वाढीमुळे कर्मचारी वर्ग आनंदला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये (Central Government Employees) सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण कोरोना संकटामुळे आर्थिक फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना आता 7 व्या वेतन आयोगानुसार (7th pay commission latest update) लवकरच महागाई भत्त्यात (Dearness Allowance-DA) 3 टक्के वाढ मिळणार आहे. आगामी सणासुदीच्या (Festival season) काळापूर्वी मिळणाऱ्या या वाढीमुळे कर्मचारी वर्ग आनंदला आहे. 1 जुलै 2021 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच ही वाढ देण्यात येणार असल्यानं आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा डीए आणि डीआर मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के होण्याची शक्यता आहे. जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले होते. डीए आणि डीआर वाढीबरोबरच केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी इतर काही लाभांचीही घोषणा केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही दुहेरी पर्वणी लाभणार आहे. हे वाचा-Petrol Price Today: 18व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबई-पुण्यात पेट्रोल काय आहेत हे पाच फायदे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक पेन्शनची (Family Pension) मर्यादा 45 हजार रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि त्यांना पुरेशी आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे. घरे बांधण्याची इच्छा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज देण्यासाठी जून 2020 मध्ये हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स सुरू करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल आणि ई-मेलवर थेट एसएमएस, ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे पेन्शन स्लिप (how to get Pension Slip) देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे. हे वाचा-Good News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार तसेच कर्मचाऱ्यांना डीए आणि डीआर व्यतिरिक्त, वाढीव घरभाडे भत्तादेखील (Home rent Allowance-HRA) मिळणार आहे. कारण महागाई भत्ता 25 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास घर भाडे भत्ता आपोआप वाढतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्त्याचा लाभ आधीच मिळण्यास सुरुवात झाली आहे. या दुहेरी फायद्यामुळे आगामी सणासुदीचा काळ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक यांच्यासाठी आनंद द्विगुणित करणारा असणार आहे.
First published: