नवी दिल्ली, 26 जून: कोरोना काळात एक सुरक्षित पर्याय (Investment Options) म्हणून प्रत्येकजण विविध पर्यायाच्या शोधात आहे. असे काही पर्याय आहेत जे पारंपरिक आहेत मात्र विश्वासार्ह आहेत. फिक्स्ड डिपॉझिट त्यापैकी एक.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला आजही अनेकांकडून पसंती दिली जाते. हा गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे. मात्र ही गुंतवणूक कुठे करावी असा प्रश्न अनेकांसमोर असतो. FD (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही याबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल तर भारतात बँक (Bank FD), पोस्ट ऑफिस (Post Office FD) आणि नॉन बँकिंग वित्तिय संस्थांमध्ये एफडी काढू शकता. मात्र अशावेळी असा प्रश्न उपस्थित राहतो आहे की, यापैकी सर्वात चांगला रिटर्न कोण देत आहे. चांगला रिटर्न मिळवण्यासाठी बजाज फायनान्स एक चांगला पर्याय आहे. याठिकाणी चांगला इंटरेस्ट मिळतो. याशिवायही काही सुविधा दिल्या जातात. तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.
हे वाचा-ऑनलाइन FD करताना सावधान! रिकामं होईल तुमचं खात, SBI ने दिला महत्त्वाचा इशारा
बजाज फायनान्समध्ये किती मिळेल व्याज?
-बँका आणि पोस्ट ऑफिसच्या तुलनेत बजाज फायनान्स एफडीवर चांगला व्याजदर देत आहे. सध्या बजाज फायनान्समध्ये 1 ते 5 वर्षापर्यंतसाठी 5.65 ते 6.60 दराने व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 5.90 ते 6.75 टक्के आहे.
-बँकांमध्ये 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीसाठी 5.30 ते 6.50 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.80 ते 6.50 टक्के च्या आसपास आहे.
हे वाचा-SBI Alert! 5 दिवसांनी बदलणार नियम, ATM मधून पैसे काढण्यासाठी किती शुल्क?
-पोस्ट ऑफिसमध्ये 7 दिवस ते 5 वर्षांसाठी काढलेल्या एफडीसाठी व्याजदर 5.50 ते 6.70 टक्के आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5.50 ते 6.70 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Sbi fixed deposit