मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ऑनलाइन FD करताना सावधान! रिकामं होईल तुमचं खात, SBI ने दिला महत्त्वाचा इशारा

ऑनलाइन FD करताना सावधान! रिकामं होईल तुमचं खात, SBI ने दिला महत्त्वाचा इशारा

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एफडी करताना होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉडबाबत ग्राहकांना सावध केलं आहे.

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एफडी करताना होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉडबाबत ग्राहकांना सावध केलं आहे.

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एफडी करताना होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉडबाबत ग्राहकांना सावध केलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 26 जून: भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने (State bank of India) त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एफडी करताना होणाऱ्या ऑनलाइन फ्रॉडबाबत ग्राहकांना सावध केलं आहे. बँकेला त्यांच्या ग्राहकांकडून याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. तुम्हाला सायबर क्राइमपासून वाचायचं असेल तर पासवर्ड/OTP/CVV/कार्ड नंबर इत्यादी माहिती कोणाकडेही शेअर न करण्याचा सल्ला एसबीआयने दिला आहे. बँकेने असं म्हटलं आहे की बँक केव्हाही फोन, SMS किंवा मेलवर हे डिटेल्स ग्राहकांना विचारत नाही.

कोरोना काळात ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत. डिजिटल बँकिंगकडे लोकांचा कल वाढतो आहे. यामुळे बँकेने त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावधानतेचा इशारा दिला आहे. एसबीआयने फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही उपायही सांगितले आहे. SBI ने त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे असं म्हटलं आहे , त्यांना असे रिपोर्ट मिळाले आहेत सायबर अपराध्यांकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये ऑनलाइन एफडी तयार केली गेल्याचं समोर आलं आहे आणि ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा-SBI Alert! 5 दिवसांनी बदलणार नियम, ATM मधून पैसे काढण्यासाठी किती शुल्क?

ज्या पद्धतीने फसवणूक केली आहे त्या संदर्भात बँकेने म्हटले आहे की फसवणूक करणारे प्रथम त्यांच्या नेट बँकिंग तपशीलाने ग्राहकांची एफडी खाती तयार करतात आणि काही रक्कम हस्तांतरित करतात. एसबीआयने म्हटले आहे की घोटाळेबाज बँक अधिकारी सांगत ग्राहकांकडून ओटीपीची मागणी करतात. यानंतर, जर ग्राहकाने ओटीपी शेअर केला तर  एफडीची रक्कम स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करून घेतात.

कधी करू नका या 5 चुका

-बँकेनं असं म्हटलं आहे की, कुणाबरोबरही डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, ओटीपी, पिन, सीव्हीव्ही किंवा यूपीआय पिन शेअर करू नका. फोन कॉल करून सर्वाधिक फ्रॉड पासवर्ड चेंज करण्याच्या नावाखाली होत आहेत. फसवणूक करणारे ग्राहकांना सांगतात की पासवर्ड चेंज नाही केलात तर कार्ड ब्लॉक होईल, ज्यामुळे घाबरून ग्राहक त्यांना पासवर्डबाबत माहिती देतात

-कधीही तुमच्या बँक खात्याची माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका. फोन चोरी झाल्यास तुम्ही फ्रॉडचे शिकार होऊ शकता

-कोणत्याही व्यक्तीसह एटीएम कार्ड डिटेल्स शेअर करू नका

हे वाचा-तुम्ही ऑनलाइन पैसे पाठवले पण ते समोरच्याला मिळालेच नाहीत? SBI ने दिला असा सल्ला

-तुमचं बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी पब्लिक इंटरनेट, ओपन नेटवर्क आणि फ्री वायफाय वरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करू नका. ओपन नेटवर्क वापरल्यास तुमची माहिती लीक होऊ शकते.

-कोणतीही बँक त्यांच्या ग्राहकांकडे यूजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, व्हीव्हीए, यूपीआय इ. माहिती मागत नाही. जेव्हा कुणी तुमच्याकडे अशी माहिती मागेल तेव्हा ती व्यक्ती फ्रॉड असल्याचं समजून जा. कोणतीही माहिती शेअर करू नका

First published:

Tags: SBI, Sbi account, Sbi ATM, SBI bank